मराठीसृष्टी टॉक्स

डॉ. श्रीपाद (राजू) बोडस आणि संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्यातील
“गप्पा… करोनाच्या”
पहाण्यासाठी येथे क्लिक करा… 

डॉ. श्रीपाद (राजू) बोडस आणि संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्यातील “गप्पा… करोनाच्या”

https://www.youtube.com/watch?v=_FM4SUlpvFs

सध्या करोना या शब्दाचा सगळ्यांनीच धसका घेतलाय. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतेय. मात्र जसे करोनाग्रस्त वाढल्याचं चित्र उभं रहातंय तसेच अनेकजण करोनामुक्त होऊन घरीसुद्धा परततायत, पण त्याबद्दल जास्त बोललं जात नाहीय. करोनातून आपण बरे होऊ शकतो हा आत्मविश्वास जनसामान्यांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे.. तरच करोनावर मात करता येईल..

ठाणे येथील एक नामांकित डॉक्टर आणि करोनामुक्त पेशंट म्हणून सुखरुप घरी परतलेले डॉ. श्रीपाद (राजू) बोडस यांची “मराठीसृष्टी डॉट कॉम” (www.marathisrushti.com) या वेबपोर्टलद्वारे संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली ही मुलाखत त्यादृष्टीने अतिशय आश्वासक ठरते.

“मराठीसृष्टी” आणि “वन आईड ऑक्टोपस स्टुडिओज” च्या “मराठीसृष्टी टॉक्स” या उपक्रमाअंतर्गत डॉ. श्रीपाद (राजू) बोडस आणि संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्यातील “गप्पा… करोनाच्या” आपण  येथे बघू शकता….

डॉ. राजू बोडस यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण झाली. जवळजवळ २० दिवसांच्या त्या काळात त्यांनी घेतलेली ट्रिटमेंट, त्यांना आलेले अनुभव.. हे सगळं अगदी मनमोकळेपणाने त्यांनी आपल्याला सांगितलंय.. आणि काळजी काय घ्यायची.. करोनापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा.. हेसुद्धा सांगितलंय….. करोना रुग्णांकडे पहाण्याच्या आपल्याकडच्या समाजाच्या दृष्टीवरही त्यांनी भाष्य केले आहे. माणसांच तर ठिक आहे, पण आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यांची करोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची यावरही डॉ. राजू बोडस यांनी सुंदर मार्गदर्शन केलंय.

एरवी अगदी “कठोर आणि रुक्ष” म्हणून हिणवल्या जाणार्‍या “सरकारी यंत्रणा” विपरित परिस्थितीतही किती आपुलकीनं काम करतायत याचाही या मुलाखतीत पडताळा येईल….. यालाच देश बदलतोय असं म्हणायचं का?

“मराठीसृष्टी” आणि “वन आईड ऑक्टोपस स्टुडिओज” च्या “मराठीसृष्टी टॉक्स” या उपक्रमाअंतर्गत डॉ. श्रीपाद (राजू) बोडस आणि संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्यातील
“गप्पा… करोनाच्या” आपण  येथे बघू शकता….


मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)


संकल्पना : निनाद प्रधान
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
“वन आईड ऑक्टोपस स्टुडिओज” च्या सहयोगाने

 

Be the first to comment

Leave a Reply