२५ वर्षे मराठी भाषिकांच्या सेवेत असलेल्या `मराठीसृष्टी’ने एक मोठा प्रकल्प हातात घेतलाय.. तो म्हणजे “Mission1M”.
“1 M” म्हणजे “One Aim”… म्हणजेच `एकच लक्ष’…
“1 M म्हणजे “One Million” म्हणजेच `एक दशलक्ष’….
या प्रकल्पांतर्गत आमचं ध्येय आहे मराठी भाषेत विविध विषयांवरील 1 Million म्हणजेच १ दशलक्ष पाने उपलब्ध करणे. यात अभ्यासपूर्ण लेखनाबरोबरच साहित्य, ज्ञान, मनोरंजन या सगळ्याच विषयांतील मजकूर उपलब्ध होईल.
हा प्रकल्प `मराठी माणसांचा, मराठी माणसांसाठी’ आहे. `मराठीसृष्टी’ हे संवादाचं माध्यम आहे.
आतापर्यंत `मराठीसृष्टी’ने कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान न कधी मागितलेय, ना कधी सरकारने दिलंय….
हा संपूर्ण प्रकल्प कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय पूर्ण करायचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प लोकसहभागातून उभा करायचा आहे. यासाठी आपल्या सर्वांना या प्रकल्पात सहभागी होण्याचं आवाहन आहे.
या प्रकल्पाची संपूर्ण माहिती www.mission1m.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे…
आपण या उपक्रमात जरुर सहभागी व्हा आणि मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावा.
प्रकल्पात सहभागी होणार्या प्रत्येकाचे नाव लोकसहभागाच्या पानावर देण्यात येणार आहे.
www.mission1m.com
आपण विविध प्रकारे या प्रकल्पात सहभागी होऊ शकता.
- कायमस्वरुपी संग्रहासाठी दर्जेदार लेखन करुन…
आपण खास या संग्रहासाठी विविध विषयांवर लेखन करु शकता.
- आपले फेसबुक, व्हॉटसऍपवरील लेखन कायमस्वरुपी संग्रहासाठी उपलब्ध करुन…
आपण फेसबुक किंवा व्हॉटसऍपसारख्या माध्यमांमध्ये लिहित असाल तर आपल्याला माहित आहेच की ते लेखन कायमस्वरुपी संग्रहित होणे आणि ते गुपलद्वारे शोधणे किती कठीण असते. हा प्रकल्प मुळातच मराठी दर्जेदारलिखाण कायमस्वरुपी Searchable Digital Archive तयार करण्यासाठी आहे.
- आपले जुने पूर्वप्रकाशित लेखन कायमस्वरुपी संग्रहासाठी उपलब्ध करुन…
आपण आपले जुने, पूर्वप्रकाशित लेख या संग्रहामध्ये ठेऊ शकता. यामुळे आपले सर्व लेखन आपल्याला एकाच ठिकाणाहून केव्हाही उपलब्ध होईल.
- आपला ब्लॉग या प्रकल्पाशी जोडून…
आपण ब्लॉग लिहित असाल तर आपला ब्लॉग उपक्रमाशी जोडून जास्त वाचकांपर्यंत पोहोचणे आपल्याला शक्य आहे. यासाठी आमच्याशी संपर्क साधा..
- कायमस्वरुपी संग्रहाच्या पानांच्या निर्मिती प्रक्रियेत भाग घेऊन…
या संग्रहातील मजकूरावर संपादकिय प्रक्रिया तसेच टायपिंग किंवा मुद्रितशोधन (Proof Reading) यासारख्या कामांमध्ये आपण सहभागी होऊ शकता…
- माहिती संकलन (Aggregation), संशोधन (Research) यासारख्या कामात भाग घेउन..
एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा करायच्या माहितीसाठी मोठ्या प्रमाणात माहितीचा शोध घेणे, ती संकलित करने, त्यावर प्रक्रिया करणे वगैरेसारख्या कमांसाठी प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आपण कोणत्या विषयातील तज्ज्ञ असाल तर आपण हे काम सहजपणे करुन कायमस्वरुपी संग्रहाच्या कामात हातभार लावू शकता…
- या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करुन…
कोणत्याही सामाजिक प्रकल्पासाठी शेवटी निधीची आवश्यकता असते.
हा प्रकल्प कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय उभा करायचा आहे.
त्यामुळे आपला प्रत्येक रुपया या प्रकल्पासाठी अत्यंत मोलाचा आहे.
आपण या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करु शकता.या प्रकल्पाला मदत करणार्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि फोटो लोकसहभागाच्या पानावर प्रदर्शित करण्यात येईल.
- आपल्या उद्योग-व्यवसायाची जाहिरात करुन…
आपण आपल्या उद्योग-व्यवसायाची जाहिरात या संग्रहातील विविध विभागांमध्ये देऊन या संग्रहाच्या कामात मदत करु शकता.. जाहिरातीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत…
- या प्रकल्पाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवून…
आपण या प्रकल्पाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या प्रकल्पाला अप्रत्यक्षपणे मदत करु शकता.