Sale!

फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – भाग १

51.00 25.00

फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – भाग १
लेखक – प्रकाश तांबे (Phone No. 8600478883)
प्रकाशक – मराठीसृष्टी

पाने – ७४
किंमत – रु.५१/- (सवलतीत रु.२५/-)

Buy using Credit / Debit Card : 

OR

By using Google Pay / UPI to : chhaya.tambe@okhdfcbank


सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री प्रकाश तांबे यांची ही पहिलीच कलाकृती.

विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका नसतो! तर कपोलकल्पित पार्श्वभूमीवर बेतलेल्या विनोदात अतिशयोक्तीला बंधन नसते. या दोन्ही तंत्रांचा लेखकाने “फिरकीच्या तांब्या” मधे वापर केला आहे.

पुस्तकाबद्दल तुमचा अभिप्राय नक्की लिहा

Buy using Google Pay / UPI to : chhaya.tambe@okhdfcbank

Buy using Credit / Debit Card :

Description

फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – भाग १
लेखक – प्रकाश तांबे
प्रकाशक – मराठीसृष्टी

पाने – ७४
किंमत – रु.५१/- (सवलतीत रु.२५/-)

सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री प्रकाश तांबे यांची ही पहिलीच कलाकृती.

टाटा समूहाच्या अग्रगण्य उद्योगात प्रदीर्घ काळ सेवा करताना निरीक्षणाच्या उपजत प्रवृत्तीमुळे लेखक असंख्य विनोदी घटनांचा साक्षीदार तर झालाच शिवाय काही घटनांच्या घडण्यामागे प्रेरणाही त्यांचीच होती. त्यांना या प्रवासात मिश्किल, मार्मिक सहका-यांची साथही लाभत गेली परंतु व्यंग आणि अश्लीलतेतून घडणा-या विनोदाला त्यांनी कधीच जवळ केले नाही. ते फार काळ टिकत नाहीत ह्या मताशी ते ठाम आहेत.

विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका नसतो! तर कपोलकल्पित पार्श्वभूमीवर बेतलेल्या विनोदात अतिशयोक्तीला बंधन नसते. या दोन्ही तंत्रांचा लेखकाने “फिरकीच्या तांब्या” मधे वापर केला आहे.

पुस्तकाबद्दल तुमचा अभिप्राय नक्की लिहा

व्हिडिओ

Author / Publisher Video

5 reviews for फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – भाग १

  1. Avatar

    अपेक्षा बिडकर, पुणे

    काका, दिवाळीच्या गडबडी मुळे सगळ्या कथा वाचून संपवायला आजचा दिवस उजाडला. पण हा फराळ खूपच चविष्ट, खुसखुशीत आणि खमंग सुद्धा होता. काही कथा पुन: प्रत्य याचा आनंद देऊन गेल्या. काही सर्वस्वी नवीन होत्या. या मेजवानी मुळे दिवाळी कशी एकदम आनंददायी होते आहे. खरोखर कधीकधी पुलंचा भास होतो तुमच्या लेखणी मध्ये. आणि nostalgic झाल्यासारखे होते. खूप मस्त…! तुमच्या लेखणी मधून असेच बहारदार लेखन अधिकाधिक आणि उत्तरोत्तर झरत रहावे, आणि आम्हाला वाचनानंद असाच मिळत रहावा, हीच सदिच्छा…!!

    अपेक्षा बिडकर, पुणे

  2. Avatar

    प्रतिक, मध्य प्रदेश

    आदरणीय प्रकाश सर मैंने यह बुक खरीदी है।मैं आपको हमेशा पढ़ता हु।रोज कहु तो भी या कहु की आपके हास्य रचना का मुझे इंतजार ही रहता है..तो भी सही ही है।मुझे मराठी पढ़ने-लिखने में कोई परेशानी नही पर लिखने में थोड़ी दिक्कत होती है।टूटीफूटी लिख लेता हूं ।कोशिश जारी है ताकि लिख सकू।आखिर मराठी मेरी मातृभाषा है।किसी ने कहा है अपनी भाषा समाप्त तो संस्कृति भी समाप्त हो जाती है।पर हम उसे बचा कर रखना चाहता हूँ।इसलिए घर पर सभी मराठी ही बोलते है। पर आपको प्रतिक्रिया नही दे पाता इस बात का खेद है मुझे।पर एक दिन आएगा जब मैं भी मराठी में आपको प्रतिक्रिया दूँगा ।

    प्रतिक, मध्य प्रदेश

  3. Avatar

    सौ.माणिक शुरजोशी, नाशिक

    अवति भवति बघायचं.
    हलक-फुलक वेचायचं.
    आल्या- गेल्याला हसवायचं.
    फिरकिच्या तांब्याला
    उघडायचं .
    तांब्यातील तांबेंचं एक एक पान वाचायचं.
    लोट पोट हसायचं .
    दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत खिळायचं.
    अवति भवति असंही बघतात,
    हे प्रकाश-विनोदातून शिकायचं.
    अभिप्राय देतांना तांबेंना
    तिथेही मिश्किल विनोद न सापडो म्हणून देवाला विनवायचं.
    माझ्या बरोबरच आपणही
    तांब्यांचा तांब्या घ्या असं
    आर्जव करायचं.
    विनोदातला विनोद शोधून
    खळाळून हसायचं.
    हसता हसता अभिप्रायाचं बस्तान गुंडाळायचं.
    राम राम म्हणून निरोपातला विनोदी सोमरस फिरकीला गिरकी देऊन तांब्यात ओतायचाच.
    असं हे धमाल पुस्तक
    सगळ्यांनी वाचायचंच.

    सौ.माणिक शुरजोशी, नाशिक

  4. Avatar

    डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी

    स्नेहपूर्वक नमस्कार ,

    *’फिरकीचा तांब्या’* घेतल्यानंतर आपल्याला मी तो वाचल्याचे कळवले होते . तहान लागल्यानंतर लगेच पाणी पोटात गेले की तहान क्षणिक भागल्याचे जसे समाधान असते तसे तेव्हा झाले होते , पण तांब्यातील पाणी समाधान देणारे आहे , औषधी आहे , तृप्तीचा सुखद ओलावा देणारे आहे , हे अंतरात्मा पुरेसा थंड झाल्यावर जाणवते , तसे झाले आहे , त्यामुळे अभिप्राय द्यायला खूप उशीर झाला आहे .

    पण खरंच गंमत वाटली पुनःपुन्हा वाचताना .

    फिरकी घेण्याची तांब्यांची शैली चांगलीच परिचयाची होती , पण फिरकीच्या तांब्यातील पाणी , मनाला ताजेतवाने करणारे आहे आणि त्या पाण्याने अनेक गोष्टी सचैल भिजवून काढल्या आहेत , हे नव्याने जाणवले .

    तुमच्या सूक्ष्म नजरेतून डोळा सुटत नाही , फ्रीज सुटत नाही . मॉल कवेत घेण्याएव्हढी नजर विशाल आहे . साडी खरेदीच्या वेळी ती नजर अतिसूक्ष्म बनते तर टकलावरून न घसरता ती नजर सुखेनैव फिरते . मुलाखतीचे कंगोरे विसकटुन सांगते . हॉटेलिंगचा पुनःप्रत्ययाचा आनंद देते आणि जेव्हा हॉटेलात जाऊ तेव्हा सावध करते.

    किती किती सांगावं तुमच्या लेखणीबद्दल.

    ती अल्पाक्षरी आहे तरीही आशयघन आहे .
    ती अनलंकृत आहे तरीही साधेपणातील सौंदर्याने दिपवणारी आहे .
    ती विषयातील वैविध्य जपणारी जशी आहे , तशी त्यातील नखरे शोधणारी आहे.
    आपली लेखणी सूक्ष्म निरीक्षणातून विनोद शोधणारी आहे .
    स्वतःवर निःसंकोचपणे व्यंगोक्तिपूर्ण भाष्य करणारी आहे.
    खळखळून हसवणारी आहे आणि हसता हसता अंतर्मुख करायला लावणारी आहे .

    खूप वेगळेपण आहे फिरकीच्या तांब्यात .

    खरं सांगू का ?

    आपण स्वतंत्रपणे वेगवेगळे दागिने पाहतो , आपल्याला ते आवडतात , त्यातील सौंदर्य मनाला भुलवते .
    पण तेच दागिने एकत्रितपणे पाहायला मिळाले तर होणारा आनंद अवर्णनीय असतो, सुखावणारा असतो , पुनःपुन्हा पाहण्यासाठी मन ओढ घेत असते .

    तसेच काहीसे झाले आहे आपले विनोदी स्फूट लेखन वाचताना .

    आता तांब्यातील पाणी प्रवाही व्हावे ,
    त्याला नवनवीन आशयाचे धुमारे फुटावेत ,
    फिरकीचा तांब्या समृद्ध व्हावा आणि त्याचा लख्ख , स्वच्छ प्रकाश ई विश्वापुरता न राहता तो सर्वदूर पसरावा यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

    आपला

    डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी

  5. Avatar

    सागरा बाणदार, इचलकरंजी

    खूपच छान अन् मनस्वी अभिनंदन… सरजी…
    दररोजच्या जगण्यातील अनेक किस्से अगदी खुशखुशीत पध्दतीने विनोद करुन सांगण्याची तुमची कला अफलातून आहे…त्यामुळे तुम्हाला स्वतःला अन्
    वाचणा-यांनाही निखळ हास्याचा मनमुराद आनंद लुटता येतो…हे सारं म्हणजे दररोजच्या जगण्यातील हरघडीचा क्षण आनंदाचा उत्सव करण्याची कला आपल्याला अवगत करायला शिकवणारी आहे…वयाचे बंधन झुगारुन देत तरुणाईला देखील लाजवेल इतकी आपल्यातील विनोदी बुध्दीची कला अधिकच विकसित होताना पाहून आम्हाला तुमचा खूप हेवा वाटतोय…मुक्त आनंदाची उधळण होवून सा-याचं जगणं सुखाचं अन् आनंदाचं व्हावं,यासाठी आपली फिरकीचा तांब्या :लोटपोट लोळवणूक या ई बुकच्या माध्यमातून सुरु असलेली प्रामाणिक धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी आहे… आता या पुस्तकाचे घरोघरी पारायणे होवून समाजात आनंदाचे गोकुळ नांदेल, अशी आशा बाळगायला देखील काही हरकत नसावी… कारण एका अनुभवसंपन्न व्यक्तीमत्वाची प्रगल्भ बुध्दी अन् सिध्दहस्त लेखणीतून दररोजच्या अनुभवाला थोडीशी काल्पनिक जोड यांचा अचूक मेळ साधत साकारलेला अनमोल असा विनोदी किस्यांचा हा पुस्तकरुपी अनमोल ठेवा,नक्कीच जगणं सुसह्य करतानाच त्याची आणखीनच गोडी वाढवणारा ठरेल, असं मला
    स्वतःला प्रामाणिकपणे वाटते…हे पुस्तक सर्वांनी वाचून त्यातून मिळालेला आनंद सर्वांपर्यंत पोहचवून एका नव्या निखळ खळखळून हसवत जगणं अनुभवणा-या आनंदाची निर्मिती करण्याच्या या सत्कार्याला हातभार लावूया…

    सागरा बाणदार, इचलकरंजी

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *