तुमची साईट मराठीत बनवा

मराठीमध्ये इंटरनेटवरील व्यवहारही आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक वृत्तपत्रे, प्रकाशक, टिव्ही चॅनेल्स वगैरेंच्या वेबसाईटस आज मराठीत आहेतच. अनेक सेलेब्रिटी, व्यक्ती आणि संस्थांनीही वेबसाईटसच्या माध्यमातून जनसंपर्क सुरु केला आहे. ब्लॉगधारकही अनेक आहेत. फेसबुकवरच्या मराठी माणसांची यादी तर भलीमोठी लांबलचक आहे. एकूणच मराठी माणूस, महाराष्ट्र वगैरे इंटरनेटवरच्या व्यवहारात मागे राहिलेला दिसत नाही.

मात्र या सगळ्यात एक महत्त्वाची ऊणीव जाणवते ती म्हणजे वृत्तपत्रे, टिव्ही चॅनेल्स आणि काही ब्लॉग्स याव्यतिरिक्त इतर बहुतांश वेबसाईटस इंग्रजीमध्ये आहेत. मराठीतील वेबसाईटसची संख्या फार मोठी नाही. नाही म्हणायला काही ब्लॉग्स आहेत मराठीत, पण त्यांच्यातील मोजकेच ब्लॉग्स सोडले तर बाकीच्यांवर नियमित लेखनाचा अभावच दिसतोय.

मराठीमध्ये वेबसाईट बनविण्यातली सगळ्यात मोठी अडचण तंत्रज्ञानाची होती. ती कधीच निकालात निघालेय. आता सहजपणे मराठीत वेबसाईट बनवण्यासाठी मराठीसृष्टीने एक खास योजना तयार केलेय.

मराठीसृष्टी वेबपोर्टल ज्या तंत्रज्ञानातून बनवलेय ते तंत्रज्ञानच आता तुम्ही वापरु शकाल.

तुम्ही फक्त लेखन करायचे. बाकीचं सगळं आम्ही पाहू.

  • वेबसाईटवरील पाने
  • फोटो गॅलेरीसोशल मिडिया लिंक्स
  • इ-कॉमर्सची सोय
  • पेमेंट गेटवे
  • मराठी सॉफ्टवेअर
  • मराठीतून संपूर्ण मदत
  • मदत पुस्तिका

यासह तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी आपली स्वत:ची मराठी वेबसाईट फक्त रु.५,०००/- पासून सुरु.

या योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त एक मेल पाठवा! अक्षरशः एका आठवड्यात तुमची वेबसाईट तयार !!!