आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

The Challenge Of Indias Internal Security

“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे.  `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे`  या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.

स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्‍या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्‍या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्‍याने सत्ताधार्‍यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.

इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/-

पुस्तक परिचय वाचा 

इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/-


 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*