मानवी मन ( Human Mind )

निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात .

मनाला अंतःकरण किंवा आतमधलं साधन असं म्हटलं जातं .उदा. डोळे, कान ,नाक ,जीभ ही बाह्य साधनं आहेत. ही साधनं आपण पाहू व अनुभवू शकतो . मात्र मन हे यापेक्षा भिन्न आहे .यात ज्ञान, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, प्रेम ,द्वेष, आशा आणि भीती ही मनाची कार्य आहेत.

व्यक्तींच्या बहुतांशी समस्या या मानसिक स्वरूपाच्या असतात व त्यावरचे उपायही मनातच असतात. अनेक सकारात्मक व नकारात्मक विचारांचे थैमान मनात सुरु असतात. अहंकार, राग, लोभ, वासना, मोह या भावना नकारात्मक असतात . त्या भावनांचा परिणाम एखादया व्यक्तीवर जास्त प्रमाणात झाला असेल तर त्याचं व्यक्तिमत्व असंतुलित होतं. आणि या भावनांना जर नियंत्रणाखाली ठेवलं तर माणसाचं व्यक्तिमत्त्व निरोगी बनू शकतो . हे सर्वस्वी व्यक्तीच्या मनावरच अवलंबून असते . माणूस निराश ,चिंताग्रस्त झाला तर त्याला पूर्ववत करणं बरेचदा अवघड जाते .
“Sound mind in a sound body.” – सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. या उक्ती प्रमाणे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यास मदत होते.

निसर्गातली आणि मानवी शरीरातली प्रत्येक गोष्ट राजस (passion, active, activity), तामस (darkness,Inertia) आणि सत्व (beingness,purity,goodness,bliss) गुणांनी मिळून बनलेली असते. या तीन गुणांमधूनच व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म ठरतात . या तीन गुणातलं प्रमाण कमी-अधिक झालं तर व्यक्तीचं मन आणि शरीर या दोघांवर वाईट परिणाम होतात (मनाचा शरीरावर व शरीराचा मनावर) वर्तमानकाळातील चालू घडामोडी यातील बाह्य परिस्थिती, भूतकाळात घडलेल्या घटना आणि चिंता यात कौटूंबिक नातेसंबंधातील दुरावा वाढून मानवी मन दुःखी होत जातो. यासाठी मानवी मनाला शांतपणे आयुष्यातील चांगल्या, आनंदीत घडून गेलेल्या गोष्टीचे स्मरण, आठवण करून ‘स्व’ ला सकारात्मक प्रेरणा दयावी व मानसिक स्थैर्य वाढवावे. हे सर्व स्वतःवरच अवलंबून आहे .

व्याख्या : मन म्हणजे काय ?

मन ही एक प्रक्रिया आहे.मनाला अस्तित्वच नसते,पण मनात सातत्याने येणाऱ्या विचारांमुळे त्याला अस्तित्त्व आहे असं वाटायला लागते.

मन म्हणजे-

केवळ आभास.
जाणिवेची विचलित अवस्था.
माणसाचा भूतकाळ.
शरीरातील एक अतिसूक्ष्म भाग .

मनाच्या आरोग्यासाठी :
1. सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे आणि श्वास याचा शरीरावर व व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.यासाठी -प्राणायाम,योगा, व्यायाम नियमित करावे.
2. व्यक्तीच्या इच्छा व वासना यावर नियंत्रण ठेवणे.
3. मनातील विचारांच्या प्रवाहाला सावकाश व्यक्त होऊ द्यावं,ज्यामुळे ते विचार शांत होत जाईल.
4. एखाद्या प्रसंगाने किंवा समस्येने मनात येणारे नकारात्मक विचार मनाला अस्वस्थ करून सोडतात.म्हणून स्वतःचे मन विचलित न करता शांतपणे मनाला सकारात्मक विचाराकडे घेऊन जाणे.
5. व्यक्तीच्या भावना,अनुभव आणि वागणूक यातून व्यक्तिमत्व घडविणे.
6. तुमच्या मनात चांगला विचार आला तर तो त्वरित अंमलात आणा आणि वाईट विचार आला तर तो लांबणीवर टाका .

— प्रा. हितेशकुमार पटले

ExamVishwa:

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*