माझा रिसर्च चा विषय

वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या  गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे. […]

मानवी मन ( Human Mind )

निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात . […]