विनया खडपेकर (ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर)

अहिल्याबाई होळकर ! ती सत्ताधारी होती, पण ती सिहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा- तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाा*मक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.

— विनया खडपेकर (ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.