महात्मा गांधी (मंगल प्रभात)

एवढें मात्र सर्वांनी लक्षात घ्यावें : अहिंसेविना सत्याचा शोध अशक्य आहे. अहिसा व सत्य ही एकमेकांशी इतकी जखडलेली आहेत की जशा काही नाण्याच्या दोन बाजू; किवा गुळगुळीत चकतीच्या दोन्ही बाजू. त्यापैकी सुलटी कोणती आणि उलटी कोणती ? तरीपण अहिसेला आपण साधन म्हणावे व सत्याला साध्य. साधन आपल्या हातातील गोष्ट आहे; म्हणून अहिसा परम-धर्म झाली. सत्य म्हणजे तर परमेश्वर. साधनाची काळजी घेतली तर कधी काळी तरी साध्याचे दर्शन घडेलच. एवढी प्रचीति पटली की जग जिकले.

– महात्मा गांधी (मंगल प्रभात)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.