भाऊ महाराज स्वर्गे ( ।। नित्योपासना ।।)

आपणास काय करावयाचे आहे. ते इतरांनी ठरवून देण्यापेक्षा आपण विचारपूर्वक काय ते ठरवावे. व त्याप्रमाणे निर्धांराने एक एक पाऊल पुढे टाकावे. अननुभवाने कदाचित चुकेलही. पण सध्या लक्षात आलेली चूक पुन्हा न करण्याची खबरदारी घेऊन पुन्हा तेच केलें तर पूर्वीइतके चुकणार नाही. व प्रयत्न सोडले नाही तर एकवेळ अशी येईल की त्यावेळी आपण यशस्वी झालेले असू. ज्याला जीवनात सफलता प्राप्त करावयाची आहे. त्याने वरील सूत्र लक्षात ठेवणे अवश्य आहे. झालेल्या चुकीने गांगरून न जाता ती पुन्हा न होऊ देण्याची खबरदारी घेणे हीच यशाची खर्‍या अर्थी वाटचाल आहे.

— भाऊ महाराज स्वर्गे ( ।। नित्योपासना ।।)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.