बाबुराव हबनीस (लक्ष्मी)

अस्सं पाटलाकडे जाऊन त्याला चांगलं खडसावं, असं लक्ष्मीच्या मनात आलं. पर लोक काय म्हणतील ही तिला भीती वाटली. ‘‘मनासारखं वागाया दिकुल लोकास्नी भ्याया लागतंया !’’ असं काहीतरी ती स्वतःशीच पुटपुटली. दोघा सासू-सुनांनी वाढून घेतलं. पण लक्ष्मीच्या घशाखाली घास उतरेना. सासूच्या लक्षात येऊ नये म्हणून तिनं पाण्याच्या घोटाबरोबर दोन-तीन घास गिळले व ताट आवरून ती स्वस्थ बसली. नंतर तिनं कामं केली ती सुद्धा अगदी शून्य मनःस्थितीतच. ओसरीवर पडलेल्या श्रीपतीच्या सामानाकडे तिनं पोरक्या नजरेनं पाहिलं अन् ते आस्तेवाईकपणानं उचलून केर काढला. इतके दिवस माजघरात बांधून ठेवलेली गादी तिनं काढली व नीट झाडून एका कोपर्यात तिची वळकटी उभी केली. माणूस किती वेड्या आशेवर जगतो हा विचार काम करताना सहज तिच्या मनात आला. स्वतःशीच खिन्नपणानं हसली.

— बाबुराव हबनीस (लक्ष्मी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.