प्राचार्य शिवाजीराव भोसले (दीपस्तंभ)

ही दिसणारी माणसे आढळात येण्यापूर्वी काही न दिसणारी माणसे मी मनाने पाहिली. ‘रामकृष्ण-विवेकानंद-श्री अरविंद’ ही माझी दैवते मला ग्रंथालयात भेटली. मी ज्या घरात राहातो त्याला ‘श्री अरविद’ हे नाव मिळाले, मी ज्या भागात राहातो ते ‘स्वामी विवेकानंदनगर’ झाले. मी कन्याकुमारीला गेलो आहे, पाँडिचेरीत राहिलो आहे, बेलूर मठ पाहिला आहे, रमण महर्षींच्या आश्रमात मी थांबलो आहे. पवनारचे परंधाम आणि वर्ध्याची गांधीजींची झोपडी ही देखील मी पाहिली आहे. माझ्या या चरित्रवेडाने मला अनेक वाटांनी फिरवले आहे. चरित्रे पाहावीत,वाचावीत, जाणावीत, आठवावीत आणि सांगावीत, हा माझा स्वभाव झाला आहे.

— प्राचार्य शिवाजीराव भोसले (दीपस्तंभ)