जी. ए. कुलकर्णी (काजळमाया)

हे सारे तुकडे, डोळे मिटल्यावर जो दिसतो त्या गडद अंधारात धारदार गतीने वणावणा फिरत राहिले, आणि अंगातील सारे त्राण त्याच काळ्या पडद्यामागे गेल्याप्रमाणे शांताक्का जड शरीराने बसून राहिल्या. आता बाहेरचे जग आणि आपण यांच्यात बंद दरवाजा आहे. इतके दिवस जगाने आपल्याला बाहेर ठेवले. आता सूड म्हणून त्याला मला पूर्ण बाहेर ठेवायचे आहे. बाहेर ठेवायचे आहे !…

— जी. ए. कुलकर्णी (काजळमाया)