कोणतीही गोष्ट विचार केल्याशिवाय करू नये

गावाबाहेर एका जंगलात एक गुराखी राहत होता. त्याच्याजवळ बर्याच शेळ्या होत्या. शेळ्यांची राखण करण्यासाठी त्याने एक मोठा कुत्रा पाळला होता. त्या जंगलात एक धूर्त कोल्हा राहात होता. त्याची नजर सदैव त्या शेळ्यांवर असे. परंतु त्याला संधी मिळत नव्हती. एकदिवस तो धूर्त कोल्हा शेळ्यांच्या कुरणातच दबा धरून बसला आणि शेळ्या चरून यायची वाट पाहू लागला. तेवढ्यात कुत्र्याने कोल्ह्याला पाहिले आणि तो त्याच्यामागे धावू लागला. त्यावेळेला कडाक्याची थंडी पडली होती. आकाशातून बर्फ पडत होते. पळता पळता कुत्रा आता कोल्ह्याच्या जवळ आला होता. तो त्याला पकडणार तोच कोल्ह्याला जवळच एक तळे दिसले. पण थंडीमुळे तळ्यावर बर्फाचा थर साठला होता. ते पाहून कोल्ह्याला कल्पना सुचली. त्याने विचार केला या बर्फावरून आपण सहज पलीकडे निघून जाऊ. आणि कुत्रा जाडजूड असल्यामुळे तो तळ्यातल्या पाण्यात पडेल. त्याप्रमाणे कोल्हा तळ्यावरून सहजपणे पुढे गेला. मागोमाग धावणारा कुत्रा मात्र त्याच्या वजनामुळे बर्फासकट पाण्यात पडला. कुत्र्याची ही अति उत्साहात केलेली अविचारी कृती त्यालाच घातक ठरली. ::
तात्पर्य – कोणतीही गोष्ट विचार केल्याशिवाय करू नये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.