अनाथांचा देव

भोजन महाल धुपादीपांनी दरवळला होता. अतिशय प्रसन्न वातावरण होतं. अनेकानेक रुचकर पदार्थांचा आणि पक्कान्नांचा घमघमाट सुटला होता. सोन्याच्या चौरंगावर पदार्थांनी भरलेले ताट ठेवलेले होते. जवळच , सोन्याच्या पाटावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बसले होते महादेवी रुक्मिणी. बाजूलाच सोन्याच्या पाटावर बसलेली होती. श्रीकृष्णाला काय हवं नको ते ती जातीने बघत होती. जेवताना वातावरण प्रसन्न राहावे म्हणून थट्टा-मस्करी, विनोद करून ती श्रीकृष्णाला प्रसन्न ठेवत होती. श्रीकृष्णांचे आनंदात जेवण चांगले ‘ चालले होते. त्यांनी दोन-चारच घास खाल्ले असतील तोच ताट बाजूला सारून ते दरवाजाकडे जायला लागले.

रुक्यिणी म्हणाली, ‘नाथ, असं भरल्या ताटावरून कोणी उठतं का?’ पण तिचे बोलणे ऐकले नाही ऐकले असं करून काहीही उत्तर न देता श्रीकृष्ण बाहेर गेले. उदास होऊन लगेचच परतले आणि पुन्हा जेवण करू लागले. रुक्मिणीने विचारताच ‘ ते म्हणाले, ‘ माझा आवडता भक्त रस्त्यातून जात? होता. काही लोक त्याला दगड मारत होते : रक्ताळलेल्या अवस्थेतही तो हसत होता. त्याला माझी गरज होती म्हणून मी उठलो होतो. रुक्मिणि म्हणाली, ‘ मग का परतलात?’ कृष्ण म्हणाले, दरवाजाबाहेर गेलो, तेव्हा माझी गरज राहिली नव्हती त्या भक्ताने स्वतःच दगड घेऊन उत्तर द्यायला सुरुवात केली. जोपर्यंत तो निराधार होता तोपर्यंत त्याचे प्राण मला चुंबकाप्रमाणे, खेचून घेत होते. आता तो निराधार नाही. त्याला दगडाचा आधार होता. तो लढतो आहे. तो आता सक्षम झाला आहे. त्याच्यातील त्याची शक्ती आता जागी झाली आहे. तो समर्थपणे संकटाला तोंड देतो आहे. जो अनाथ, दुर्बल आहे त्याच्या मागे मी आहे.!

तात्पर्य : आपले मन-हात भरलेले आहे, तोपर्यंत परमात्म्याचा आधार नसतो. जेव्हा तो लाभतो तेव्हा आपण निराधार असतो.