उपवासाची चकली

साहित्य : तीन वाट्या उपवासाच्या भाजणीचे पीठ, चवीपुरते तिखट, जिरेपूड एक चहाचा चमचा, चहाचे दोन चमचे लोणी, मीठ, तूप.

कृती : मंद गॅसवर पातेल्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवा. त्यात जिरेपूड, तिखट, मीठ, लोणी, घाला. पातेल्यातील पाणी उकळले की पातेले खाली उतरावा. पीठ चाळा, भाजणीचे पीठ त्यात हळूहळू सोडा चांगले कालवा. नंतर मिश्रण झाकून ठेवा. थंड झाल्यावर हे पीठ पसरट भांड्यात (परातीत) काढा. चांगले मळून घ्या. कढईत तूप गरम करा. सोऱ्यात चकलीचा साचा घालून या तयार केलेल्या पिठाच्या चकत्या पाडा. तळा. गरम असतानाच दह्याबरोबर खा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*