आजचा विषय मायक्रोवेव्ह ओव्हन

दिवाळीला, काय नवीन खरेदी करायची हा प्रश्न पडतो. परवा एअर फ्रायर झाला आज या दिवाळीला मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करणार असल्यास आज मायक्रोवेव्ह ओव्हनची माहिती व काही कृती.

आजकाल घरोघरी मायक्रोवेव्ह असतो, पण त्याचा वापर अन्नपदार्थ गरम करण्यापुरताच केला जातो. खरंतर आपले रोजचे कितीतरी अन्नपदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करता येतात. मायक्रोवेव्ह ओव्हन वापरून हेच पदार्थ अगदी सहजपणे करता येतात. फारसे कष्ट न करता हे पदार्थ उत्तम होतात.आपल्याकडे आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तळलेले पदार्थ. आपण तळलेले पदार्थ खूप मोठय़ा प्रमाणात खातो. ओव्हनमुळे तेलाचा खूप कमी वापर होतो, वर पदार्थाच्या चवीमध्ये कुठेही फरक पडत नाही. तेल-तूप खूप कमी वापरल्यामुळे प्रकृती उत्तम राहते. मायक्रोवेव्ह ओव्हनचा शोध १९४६ मध्ये डॉ. परसी स्पेन्सर यांनी लावला.गृहिणींना मायक्रोवेव्ह ओव्हनबद्दल बऱ्याच शंका असतात.शिजणाऱ्या पदार्थातील पोषणमूल्ये तशीच राहतात का ? हो.

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मेटल का वापरू नये?
मेटलमधून करंट जातो. त्यामुळे भांडय़ातील पदार्थाना उष्णता मिळणार नाही.मायक्रोवेव्हिंगने तयार केलेले पदार्थ शरीराला अपायकारक असतात का?
नाही.

मायक्रोवेव्ह कूकिंगचे फायदे
शिजायला खूप कमी वेळ लागतो.पदार्थातील पोषणमूल्ये तशीच राहतात.पॉवर कमीजास्त वापरण्याच्या पद्धतीमुळे वीज कमी लागते.पदार्थ आधी शिजवून ठेवून आयत्या वेळी गरम करून खायला घेऊ शकता.तेल-तूप कमी वापरले जाते.कुरडया, पापडय़ा न तळताही यक्रोवेव्हमध्ये चांगल्या फुलतात.कुरकुरीत होतात.मायक्रोवेव्हमध्ये वापरावी लागणारी भांडी मायक्रोवेव्ह प्रूफ काचेची, प्लास्टिकची किंवा सिरॅमिक भांडी वापरावी. प्लास्टिकची भांडी री-हीटिंगला वापरावी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ: लोकप्रभा

मायक्रोवेव्ह वापरण्याच्या टिप्स : १०० टक्के पॉवरवर पदार्थ री-हीट करू नका.पॉवर ५० टक्क्य़ांवर आणून पदार्थ दोन-तीन मिनिटं री-हिट करा. पदार्थ अगदी ताजा बनविल्यासारखा दिसतो. कुठलाही पदार्थ री-हीटिंग करताना पदार्थावर स्प्रिंकलरने पाणी शिंपडून री-हीट करा. त्यामुळे पदार्थ ताजा वाटतो. उदा. शिजवलेला भात, तयार भाजी, कुठलीही रस्सा भाजी व कुठलाही मटणाचा रस्सा, शेंगदाणे भाजण्यासाठी शेंगदाण्यांवर थोडे पाणी शिंपडून जर अर्धा किलो शेंगदाणे असतील तर १०० टक्क्य़ांवर २ मिनिटे शेंगदाणे भाजा. परत मायक्रोवेव्हचे दार
उघडून शेंगदाणे चमचाने हलवून परत १०० टक्के पॉवर एक मिनिट द्या व बंद मायक्रोवेव्हमध्ये थोडा वेळ दाणे राहू द्या.दही करायचे असेल तर अर्धा लिटर दूध १०० टक्के पॉवरवर एक मिनिट गरम करून त्याला विरजण लावा. एक ते दीड तासांत दही तयार होते. मायक्रोवेव्हमध्ये फोडणी करू नका.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ: लोकप्रभा

मायक्रोवेव्ह मध्ये केलेले काही पदार्थ.
कांदेपोहे
साहित्य : एक वाटी भिजवलेले पोहे, एक टीस्पून तेलाची फोडणी (तेलाची फोडणी- मोहरी, जिरे, मिरची व कढीपत्ता घालून तयार करून ठेवा), एक कांदा चिरलेला, एक टीस्पून लिंबाचा रस, साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर.
कृती : काचेच्या पसरट भांडय़ात चिरलेला कांदा घेऊन त्यावर फोडणी घालून हलवा. झाकून १०० टक्के पॉवरवर ३ मिनिटे ठेवा. बाहेर काढून त्यात पोहे, मीठ, साखर, लिंबूरस आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा.
झाकण ठेवून १०० टक्के पॉवरवर दीड मिनिटे ठेवा. तीन-चार मिनिटांनी बाहेर काढून, हलवून पुन्हा थोडी कोथिंबीर पाहिजे असल्यास घाला. पोहे खायला तयार.
टिप्स : १) फोडणीचे प्रमाण वाढवू शकतो. / २) एक वाटी पोहे या प्रमाणात पॉवरची मिनिटे दिली आहेत. पोह्यचे प्रमाण वाढल्यावर मिनिटेसुद्धा वाढतील.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

साबुदाणा खिचडी
साहित्य : एक वाटी भिजवलेला साबुदाणा, दोन चमचे तुपाची फोडणी (जिरे, मिरचीचे तुकडे घालून फोडणी गॅसवर करून घेणे), अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर, लिंबूरस, ओले खोबरे, कोथिंबीर.
कृती : सर्व गोष्टी एकत्र करून चांगल्या मिसळा. झाकण ठेवा. १०० टक्के पॉवरवर एक ते दीड मिनिटे ठेवा. दोन-तीन मिनिटांनी बाहेर काढा. हलवून हे खायला द्या. टिप्स : १) गार झालेली खिचडी री-हीट करताना पाणी किंवा दुधाचा हबका मारून १ मिनीट १०० टक्के पॉवरवर गरम करा. २) खिचडी करताना जास्त शिजवू नका, साबुदाणा चिवट होतो.३) खिचडीचे सर्व कच्चे साहित्य एकत्र करून हे मिश्रण ३-४ दिवस फ्रिजमध्ये राहते. पाहिजे तेव्हा फोडणी घालून वरीलप्रमाणे ताजी खिचडी तयार करू शकता.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*