मक्याच्या पिठाचे पराठे

साहित्य :- तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल .

कृती -: मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे त्यात मिरच्या व आले एकत्रित वाटून घालावे. चवी नुसार मीठ, हिंग, हळद, घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. मक्याच्या पिठाची थोडी मोठी लाटी करून वाटीचा आकार द्यावा व त्यात बटाटाचे सारण भरावे. नंतर हलक्या हाताने जाड पुरीप्रमाणे लाटून घ्यावे व तळावे.

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*