आजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती

ज्याने जगभरातल्या सगळ्या संस्कृतींवर, कलेवर, शिक्षणावर आणि बऱ्याच गोष्टींवर आपली छाप पाडली.. किंवा असंही म्हणता येईल की, किती तरी गोष्टींचा खरा उगम याच देशातून झाला तो ग्रीस. ग्रीस हा युरोपमधला हा उंच सखल भागाचा प्राचीन देश. मुळातच चिकित्सक बुद्धीचा ग्रीक माणूस काळाच्या नेहमीच पुढे होता. आजही जेव्हा शाळेची पुस्तकं आपण चाळू लागलो की, अॅदरिस्टॉटल, आíकमीडीज, अलेक्झांडर दी ग्रेट, पायथागोरस, प्लेटो अशी किती तरी नावं प्रत्येक विषयाच्या पुस्तकात हटकून सापडतात. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा देश. या देशानं किती तरी लढाया पाहिल्या आहेत. अलेक्झांडरने आपल्या कारकिर्दीत, ‘जोपर्यंत जमीन संपत नाही आणि समुद्र संपत नाही तोपर्यंत माझं राज्य असेल’ अशी मनीषा बाळगली आणि ती खरी करून दाखवली. युरोपीयन संस्कृतीची ‘गंगोत्री’ असं ग्रीसला खऱ्या अर्थानं म्हणता येईल. इथली शिल्पं सुबक, अत्यंत देखणी, प्रत्येक स्नायूचे पीळ हुबेहूब दिसून येतील अशी. ग्रीक जेवणामध्ये ऑलिव्ह ऑइल, टोमॅटोज्, फेटा चीज (बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज), ताज्या भाज्या, वांगी, सीफूड हे प्रामुख्यानं खाल्लं जातं.

युरोपातल्या या प्राचीन पण प्रगत संस्कृतीचं साऱ्या जगाला अप्रूप. त्यांच्या खाद्यसंस्कृतीची सावलीही संपूर्ण युरोपावर पडलेली दिसते. ग्रीक सॅलड हा तिथल्या मेन्यूकार्डवरचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात लोकप्रिय पदार्थ.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही ग्रीक पदार्थ
ग्रीक सॅलड
साहित्य : ड्रेसिंगकरिता : ऑलिव्ह ऑइल – ३ टेबलस्पून, ड्राइड ओरेगॅनो लीव्हज् – १ टी स्पून, लसूण – १टी स्पून, रेड वाइन विनेगर – १ टी स्पून (असल्यास), लिंबाचा रस – १ टेबलस्पून, काळी मिरीपूड, मीठ
सॅलडकरिता : रोमन लेटय़ूस – १ (हे नसल्यास आइसबर्ग किंवा कुठलेही उपलब्ध असलेले लेटय़ूस सॅलडचे पान वापरा), काकडी – सोलून स्लाइस केलेली १, कांदा – १ ( पातळ स्लाइस), लाल सिमला मिरची – १ (पातळ स्लाइस), टोमॅटो – २, बारीक चिरलेली पुदिना पाने – १०, फेटा चीज – ५० ग्रॅम (हे बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज असते, हे नसेल तर पनीर वापरा), कालामाता ऑलिव्हज – १०-१२ (हे ग्रीक ऑलिव्हज जगामधले सर्वोत्कृष्ट ऑलिव्हच्या जातींपकी एक. मिळाले तर बघा. नाही तर रेग्युलर बॉटलमधले ऑलिव्हज वापरा), मीठ, काळी मिरी.
कृती : एका छोटय़ा बाऊलमध्ये ऑइल, ओरेगॅनो, लसूण, वाइन व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र करा. चवीपुरतं मीठ आणि काळी मिरीपूड टाका. सॅलडचे साहित्य बाऊलमध्ये टाका. एकत्र मिक्स करून सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

स्पॅनाकोपीता (ग्रीक स्टाइल पालकाचे पफ्स)
साहित्य :व्हेजीटेबल ऑइल – दोन टेबलस्पून, कांदे (बारीक चिरलेले) – दोन मोठे, पालक (उकडून बारीक चिरलेला)- एक जुडी, फ्रेश शेपू (बारीक चिरलेला) – दोन टेबलस्पून, मदा – दोन टेबलस्पून, फेटा चीज – २५० ग्रॅम (हे बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज असते. हे नसेल तर पनीर वापरा) अंडी – ४, मीठ, काळी मिरीपूड, बटर – २०० ग्रॅम, फिलो पेस्ट्री – एक पॅकेट (सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असते. साधारणपणे खारीसारखी दिसणारी ही एक पट्टी असते. बेक केल्यावर खारीसारखेच पापुद्रे पडतात. फिलो पेस्ट्रीचं पॅकेट नाही मिळालं तर खारीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाटलेल्या मद्याच्या पट्टय़ा वापरल्या तरी चालतील किंवा सरळ पट्टी समोशाच्या पट्टय़ा रेडीमेड मिळतात त्या वापरा.)
कृती : मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये कांदा टाका आणि मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. त्यामध्ये पालक, शेपू आणि मदा टाका. साधारण पाच मिनिटे शिजवून घ्या. गॅस बंद करा. त्यामध्ये फेटा चीज, अंड, मीठ आणि मिरीपूड टाका. फिलो पेस्ट्रीच्या पट्टय़ा पसरवून घ्या आणि त्यावर बटर लावून घ्या. फिलो पेस्ट्रीच्या पट्टीवर थोडे पालकाचे मिश्रण ठेवा आणि त्याला त्रिकोणी आकारात फोल्ड करून घ्या. १७५ डिग्री सेल्सिअसवर ओव्हन प्री-हीट करा. तयार त्रिकोणांवर थोडं बटर लावून ते बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. २५ ते ३० मिनिटं किंवा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत बेक करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

फॅसोलाता सूप
साहित्य : पांढरी चवळी – ४०० ग्रॅम, ऑलिव्ह ऑइल – अर्धा कप, बारीक चिरलेला कांदा – एक मोठा, ठेचलेल्या लसूण पाकळ्या – दोन ते तीन, बारीक चिरलेली सेलरी – एक जुडी, बारीक चिरलेले पार्सली – दोन टी स्पून, गाजर – १ मध्यम बारीक चिरलेले, फेश टोमॅटो (पल्प) – ५०० ग्रॅम, टोमॅटो बारीक चिरलेले – एक टी स्पून, मीठ, काळी मिरीपूड पाव टी स्पून, ओरेगॅनो अर्धा टी स्पून, साखर – १ टी स्पून
कृती : चवळी दोन तास पाण्यात भिजवून ठेवा. पाच मिनिटे शिजवून घ्या. पाणी काढून टाका आणि चवळी धुऊन घ्या. यामुळे सूपला काळेपणा येणार नाही. आता तेल गरम करा आणि त्यामध्ये कांदा आणि लसूण परतून घ्या. सेलरी आणि गाजर टाका. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटो प्युरी टाका. त्यानंतर यामध्ये चवळी, काळी मिरीपूड, ओरेगॅनो, साखर टाका आणि सर्व एकत्र मिक्स करा. आवश्यक तेवढं पाणी टाका आणि उकळी येऊ द्या. झाकण ठेवून मंद गॅसवर साधारण दीड तास चवळी शिजू द्या. सर्वात शेवटी मीठ टाकून टेस्ट अॅाडजस्ट करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*