डाएट फराळ

डाएट फराळ
आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या काही कृती.

डाएट फराळाच्या काही कृती
रव्याचा चिवडा
साहित्य : रवा १ वाटी, कणीक १ वाटी, मीठ १ चिमूटभर, तेल ४ चमचे, तिखट, हळद, आमचूर पावडर चवीनुसार, धने, जीरे पावडर अर्धा-अर्धा चमचा, हिंग २ चिमूट.
कृती : हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेणे. सोपेची पावडर करून घ्यावी. नंतर तयार झालेला गोळा किसणीने किसून डीप फ्राय करावा. कुरकुरीत झाल्यानंतर वरील तयार केलेला मसाला व बारीक सोपेची पावडर घालून हलक्या हाताने एकत्र करून खायला दय़ा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बेक्ड चकली
साहित्य : चकलीची भाजणी २ वाटय़ा, तीळ १ चमचा, ओवा १ चमचा, धणे जीरे पावडर १ चमचा, तिखट, मीठ चवीनुसार, लसूण, हिरवी मिरची १-१ चमचा, कोथिंबीर पेस्ट २ चमचे, आमचूर -अर्धा चमचा, तेल – तळायला
कृती : चकलीची भाजणी व मसाले एकत्र करून घेणे. नंतर २ वाटय़ा पाणी उकळत ठेवून त्यात चकलीच्या पिठाची उकड काढून घेणे. उकड काढल्यावर त्यात अर्धा चमचा इनो घालून पुन्हा मळून घेणे. त्याच्या चकल्या पाडून २०० डिग्रीवर १२ ते १५ मिनिटे बेक करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बेक्ड करंज्या
साहित्य:- २ कप मैदा, २ मोठे चमचे पिठी साखर, ५ मोठे चमचे फ्रिजमधील थंड साजूक तूप,एक चिमूट मीठ, २-३ मोठे चमचे फ्रिजमधील थंड पाणी, २ मोठे चमचे पातळ तूप
करंजीच्या सारणासाठी लागणारे साहित्य:- २ कप खवलेला ओला नारळ, ४ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क
२ मोठे चमचे पिठी साखर, ३ मोठे चमचे पिस्त्याची बारीक पूड, १/४ लहान चमचा वेलदोडय़ाची पूड
एक चिमूट केशर.
कृती:- प्रथम सारण करण्यासाठी नारळ, कंडेन्स्ड मिल्क, पिठी साखर, पिस्त्याची भरड, वेलदोडय़ाची पूड आणि केशर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांडय़ात एकत्र करावे. मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर शिजवावे. नंतर बाहेर काढून एकजीव करावे व पुन्हा तीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. शिजल्यावर सारण एकजीव झाले पाहिजे; फार ओलसर वाटल्यास आणखीन तीस सेकंद शिजवावे. मग गार करण्यास बाजूला ठेवावे. पारी करायला, मदा, तूप, पिठी साखर आणि मीठ एकत्रित मिक्सर मध्ये ठेवून क्षणभर फिरवावे. असे केल्यास मिश्रण पावाच्या चुऱ्यासारखे दिसू लागेल. आता त्यात एक-एक करून २-३ मोठे चमचे अगदी थंडगार पाणी घालून पुन्हा पल्स करावे. मिश्रण जरा एकत्र येऊ लागेल. दिसायला कोरडे दिसले तरी त्यात आणखी पाणी घालू नये. लाटताना पीठ एकत्र येईल. अर्धवट एकत्र आलेले पीठ िक्लग फिल्म किंवा प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून, थोडे चपटे करून फ्रिजमध्ये २०-२५ मिनिटे ठेवावे. मग त्याचे लिंबाएवढे भाग करून प्रत्येक भाग प्लास्टिकच्या दोन कागदांमध्ये लाटावा. त्याच्या मधोमध दोन लहान चमचे सारण ठेवावे आणि कागदाच्या आधाराने पारी दुमडावी. कडा दाबून, कातण्याने कापावे. अशा सगळ्या करंज्या करून घ्याव्यात. बेकिंग ट्रे वर तूप लावावे किंवा बटर पेपर लावावा. त्यावर करंज्या ठेवाव्यात. ओव्हनमध्ये १७५ डिग्री तापमानावर करंज्या १५-२० मिनिटे भाजाव्यात. मग त्या बाहेर काढून त्यावर वितळलेले तूप लावावे आणि पुन्हा ५-१० मिनिटे करंज्या भाजाव्यात. तयार झाल्यावर त्यांचा रंग गुलाबी होतो आणि करंज्या खुसखुशीत होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बेक्ड तिखटा-मिठाचे शंकरपाळे
साहित्य: –२ कप मैदा, १ कप कणीक, १/४ कप तेल, १ लहान चमचा भरडलेला ओवा ,१/२ लहान चमचा तिखट, चवी नुसार मीठ, १/४ लहान चमचा बेकिंग पावडर, साधारण १/४ कप थंड पाणी.
कृती:- प्रथम पाण्याव्यतिरिक्त इतर सारे साहित्य एखाद्या मोठय़ा भांडय़ात एकत्र करावे.
मग थोडे-थोडे करत, गार पाणी घालून पीठ एकत्र करावे. फार मळू नये. भिजवलेले पीठ घट्ट असावे. झाकण घालून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे. पिठी किंवा तेल न लावता भिजवलेले पीठ ५ मिलीमीटर जाडी होईल इतके लाटावे. मग त्याचे आवडेल तसे चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारखे आकार कापावेत.
काटय़ाने प्रत्येक तुकडय़ावर भोके पाडावीत. शंकरपाळे बेकिंग ट्रे वर लावलेल्या बटर पेपरवर ठेवावीत.
ओव्हनमध्ये १७५ डिग्रीवर १५-२० मिनिटे, सोनेरी होईपर्यंत भाजा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*