कॉर्न डोसा

साहित्य:- स्वीटकॉर्न १ कप, रवा २ कप, १ कांदा बारीक चिरलेला, आलं आणि मिरची बारीक चिरलेली, हळद, जिरे पूड, किथिंबीर, कडीपत्ता, मीठ, २ टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि तेवढीच कणिक, थोडं तेल, बडीशेप आवडत असेल तर.

कृती:- स्वीटकॉर्न आणि रवा वेगवेगळा रात्रभर भिजत ठेवा. स्वीटकॉर्न मिक्सर मधून जाडसर भरडून घ्या. रव्यात कॉर्न मिश्रण मिक्स करा व वरीलसर्व साहित्य एकत्र करून नीट हलवून घ्या. अर्धा तास मिश्रण तसच ठेवा. त्यात थोडे पाणी घालून तव्यावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या व चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*