चटकदार चटण्या

कोथिंबीरीची चटकदार परतलेली चटणी
अतिशय सोपी , झटपट होणारी व जेवणाची रुची वाढवणारी चटकदार चटणी.
साहित्य दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन टेबलस्पून पांढरे तीळ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,एक छोटा चमचा मोहरी,चवीनुसार मीठ.
कृती : गॅसवर फ्रायपॅनमध्ये चमचाभर तेल तापवून घेऊन त्यात मोहरी व पांढरे तीळ टाकून ते तडतडल्यावर त्यात हिरव्या मिर्च्यांचे तुकडे घालून परता,मग बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून एक दोन मोनिटे परतून घ्या. झाली आपली चटकदार चटणी तय्यार !
पोळी-भाता सोबत सर्व्ह करा आणि जेवणाची लज्जत वाढवा.

सेजवान चटणी –
8-10 सुक्या लाल मिरच्या बेडगि पाण्यांत भिजवून घेणे त्याची बारीक पेस्ट तयार करुन घेणे 10-12 लसुण पाकळ्या कापून बारीक करणे 1इंच आले बारीक कीसुन घेणे एका कढईत 1पली तेल घ्या ते गरम करुन लसुण व अदरक परतुन घ्या 2टोमॅटो ची प्युरी करुन त्यात टाकुन ती परतणे नंतर वाटलेलि पेस्ट टाकणे 1चमचा सोया सॉस टाकणे 1चमचा साखर 1चमचा वीनीगर व चवीनुसार मीठ घालणे तेल सुटे पर्यंत चांगले परतणे .सेजवान चटणी तयार .

चिंच खजूर चटणी
एक वाटी बिया काढलेली चिंच, १५ नग बिन-बियांचे खजूर, एक वाटी पिवळाजर्द गूळ, २०-२५ बेदाणे, एक चमचा लाल मिरचीचे तिखट, दोन- तीन चमचे धणे-जिरे पावडर.
कृती : चिंच, खजूर आणि गूळ सहा-सात तास एकत्र भिजत घालावे. मग एका भांड्यात हे सर्व घेऊन त्यात धणेजिरे पावडर, तिखट, बेदाणे घालावे आणि चांगले खदखदू लागेपर्यंत शिजवावे. थोडे गार झाल्यावर एका चाळणीवर ओतून हाताने सारखे करून घ्यावे. वर ऊरलेला चोथा मिक्सरमधून काढून घ्यावा. मग सर्व नीट एकत्र करावे.
ही चटणी एक- दोन महिने फ्रिजमधे सहज टिकते. मात्र त्याला जराही पाण्याचा अंशही लागता कामा नये.
खमंग ढोकळा,सामोसे,शेवबटाटापूरी,रगडापॅटीस, आलूचाट इ. पदार्थांसोबत ही चटणी लागतेच.

लाल चटणी
एक माप लसूण तुकडे ,+ दोन ते तीन माप लाल तिखट पावडर ( काश्मिरी / बेडगी ) +अर्धा ते एक माप मालवणी /संडे /पावभाजी मसाला /कांदा लसूण कोल्हापुरी मसाला + मीठ चव बघून + सुखी ठेवायची असेल तर पाणी घालू नका आणि मिक्सर जार मध्ये बारीक करा –पेस्ट करायची असेल तर पाणी वापरा

भरपूर टिकते —पावभाजी,भेळ,सँडविच ,मिसळ साठी वापरता येते –तेल /दही घालून तोंडी लावणे होते , वडे, भजी बरोबर दही घालून चटणी छान लागते

हिरवी चटणी
१ ) एक माप आल्याचे तुकडे ,दोन माप लसूण तुकडे , चार माप हिरवी मिरची तुकडे ( तिखट मिरची घ्या) ,दोन माप कढीपत्ता चिरून , मीठ चव बघून,लिंबू रस /सायट्रिक ऍसिड , दोन ते चार माप कोथिंबीर देठासाहित चिरून —हे सगळे मिक्सर जार मध्ये बारीक पेस्ट करा

२) एक ते दोन माप आल्याचे तुकडे , चार माप मिरची तुकडे , दोन माप कढीपत्ता , लिंबू रस /सायट्रिक ऍसिड , डॉ ने चार माप देठासह कोथिंबीर चिरून —मिक्सर जार मध्ये पेस्ट करा –(उपासाला कढीपत्ता चालत नसेल तर नका वापरू )

३) पुदिना /मिंट वापरून —वरील दोन प्रकारात पुदिना दोन माप वापरून पुदिन्याच्या चवीची चटणी बनवा

४) चाट मसाला वरील दोन चटण्यात आणि पुदिना चटणीत वापरा –खास भेळ /पाणी पुरी /रगडा पॅटिस साठी

वरील सर्व चटण्या भरपूर टिकतात –या चटण्या , पाव भाजी, सँडविच,मिसळ ,भेळ आयटमस ,दाबेली ,पिझ्झा साठी वापरा –आणि बटाटा वडा , साबुदाणा वडा , थालीपीठ,भजी , बरोबर मस्त लागतात –दही घालून किंवा दह्या शिवाय

ही पण चटणी भरपूर टिकते

भाजकी पंढरपुरी डाळ /भिजवलेली चणाडाळ वापरून केलेली झटपट चटणी —–हि चटणी इडली ,डोसा,उत्तपे, आप्पे बरोबर खायला झटपट करता येते —भाजकी डाळ ,लसूण , हिरवी मिरची , कांदा ,कैरी , नारळ ,आले , कोथिंबीर लिंबूरस /आमचूर/सायट्रिक ऍसिड ,साखर , दही पैकी जे असेल ते वापरून –हे सगळे मिक्सर जार मध्ये घालून मिक्सर जार ने बारीक पेस्ट करून झटपट चटणी तयार —भाजकी डाळ नसेल तर चणाडाळ भिजत घाला दोन तीन तास आणि वरील प्रमाणे च चटणी बनवा

पुडी चटणी

पुडी चटणी ( साउथइंडिअन चटणी )

साहित्य: 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उदीड डाळ, 4 चमचे तूर डाळ, 1 वाटी सुके खोबरे किसून, 2 वाट्या सुकी लाल मिर्ची (आवडी नुसार आणि मिर्चीच्या प्रकारा नुसार प्रमाण कमी जास्ती करता येईल पण ही चटणी थोडी तिखटच असते), 1 वाटी कढिपत्ता, 1 लिंबा एवढी चिंच, 4 tbsp गूळ, चवीनुसार मीठ, 4 tbsp तेल, 1 tsp मोहरी, 1 tsp हिंग, 1 tsp हळद
कृती: तिन्ही डाळी मंद आचेवर एक एक करून कोरड्या खमंग भाजून घ्या. डाळी व्यवस्थीत भाजल्या गेल्या तरच चटणीला perfect चव येते,तेव्हा डाळी कच्या राहणार नाहीत आणि करपणार नाहीत ह्याची काळजी घ्या.
खोबरे खमंग कुरकुरीत भाजून घ्या.

चिंच कोरडी होई पर्यंत भाजून घ्या
2tbsp तेलात मिरच्या आणि कढिपत्ता घालून कुरकुरीत परतून घ्या. भाजलेल्या डाळी गार झाल्या की मीक्सरला किंचित करकरीत दळून घ्या. नंतर इतर सर्व साहीत्य मीठ आणि गुळ घालून बारीक दळून घ्या. दळलेला मसाला आणि दळलेल्या डाळी हातानी एकत्र करून घ्या.
उरलेल्या 2tbsp तेलात मोहरी हिंग आणि हळद घालून फोडणी करून घ्या. फोडणी गार झाली की तयार चटणीत घालून नीट मिक्स करून घ्या. चटणी घट्ट झाकणाच्या डब्यात महिनाभर छान राहते. चटणी तेल किंवा ताक घालून इडली डोसा तसेच दही भात सोबत वाढता येते.
पोडी डोसा रेसिपी मधे हीच चटणी वापरली आहे.

शेंगदाणा चटणी
१) भाजलेले शेंगदाणे साले काढून , लाल तिखट पावडर, जिरेपूड , मीठ, साखर , सायट्रिक ऍसिड /आमचूर –हे सगळे मिक्सर जार मध्ये भरड वाटा –आणि एका वेळी मिक्सर न फिरवता इंचिंग मोड मध्ये चालू बंद चालू बंद करा –जर तेल सुटले नाही तर चमचा भर शेंगदाणा तेल घाला आणि मिक्स करा –उपासाला चालते

२) बिन उपासाची —भाजलेले शेंगदाणे साले काढून , हिरवी मिरची ,आले, लसूण ,कांदा ,कोथिंबीर , लिंबूरस ,कढीपत्ता , मीठ चव बघून, थोडी साखर मिक्सर जार मध्ये भरड बारीक करा —लसूण किंवा कांदा पैकी एकच वापरून पण होते ,आले नसले तरी चालेल

३) उपासाची चटणी –कच्चे शेंगदाणे, आले, मिरची,कढीपत्ता ,मीठ, लिंबूरस /दही , मीठ साखर चव बघून —उपासाच्या पदार्थ बरोबर ( कढीपत्ता उपासाला चालत नसेल तर नको ) —थोडे पाणी घालून पातळ करा –मिरची ऐवजी लाल तिखट पण चालेल

वरील चटण्या बेसिक आहेत –त्या नारळ, कैरी, पालक , बटाटा , कोथिंबीर घालून वाढविता येतात

वरील सर्व चटण्या मध्ये फोडणी ( हळद ,हिंग मोहिरी ./जिरे –तेल /तूप वापरून ) घातली तर नक्कीच चव वाढेल –किंवा खर्डा करताना वरील काही चटण्या फोडणीत घालून करतात

वरील चटण्या मध्ये नारळ, पालक , उकडलेला बटाटा , कच्चा बटाटा , कोथिंबीर , कैरी घालून त्या चटण्या वाढविता येतात –किंवा वेगळ्या चवीच्या बनविता येयात

सँडविच साठी चटण्या
१ लाल चटणी —लाल चटणी ची पाणी घालून पेस्ट करा आणि ती ब्रेड ला बटर लावले कि लाल चटणी फासा दोन्ही स्लाइस ना –आणि फक्त शिजलेल्या बटाट्याचे स्लाइस घाला –मीठ, वर पेरून सँडविच बनवा –चाट मसाला ऐच्छिक

२– हिरवी चटणी आणि पालक घालून हिरवी पेस्ट करा आणि सँडविच साठी बटर लावून ही चटणी लावा नंतर बटाटे /टोमाटो/काकडी /कांदा /भोपळी मिरची चे स्लाइस एकावर एक लावून घ्या -त्या वर लेट्युस/कोबीचे चे पान , चीझ स्लाइस, मेयोनिज सौस , लावून वर बटर लावलेला स्लाइस्ला टोमॅटो केचप लावून सँडविच पुरे करा –ग्रील /टोस्ट करणार असाल तर बाहेरून सुद्धा बटर लावून टोस्टर मध्ये भाजून घ्या क्रिस्पी होई पर्यंत

३) वरची हिरवी पुदिना चटणी , खवलेला नारळ ,कोथिंबीर , मीठ ,साखर ,लिंबूरस चव बघून –मिक्सर जार मध्ये फाईन पेस्ट करा –एक टीप –जर हि चटणी बनविताना त्या मध्ये ब्रेड चे साईड चे तुकडे घातलेत तर जास्त चांगली लागतात सँडविच

भेळे साठी /दाबेली साठी चटण्या
१) चिंच गुळाची चटणी –चिंचेचा कोळ एक प्रमाण , गूळ तीन ते चार प्रमाण पातळ करून , जिरे पूड, लाल तिखट पावडर , मीठ चव बघून ,—-( उपसा साठी )—बिन उपसा साठी याच चटणी मध्ये धने पूड आणि काळे मीठ ( साध्या मिठा ऐवजी ) ,चाट मसाला , (पाणी पुरी मसाला ऐच्छिक )–हे सगळे मिक्स करून पाणी घालून एक उकळी आणा —-ही आणि /किंवा वरील खजूर चटणी भेळेचे सगळे आयटम , पाणी पुरी , चाट , रगडा पॅटिस आणि दाबेली रोटी साठी वापरा

२) हिरवी चटणी –वरील हिरवी चटणी –पुदिना सह घेऊन त्यात जास्त कोथिंबीर देठासह घालून पातळ पेस्ट करा –चाट मसाला ,काळे मीठ ,धने जिरे पावडर, पाणी पुरी मसाला घालून मिक्स करा ,जरा जास्त तिखट असुदे हि चटणी

ही हिरवी चटणी पाणी पुरी , भेट आयटम , दाबेली रोटी ,रगडा पॅटिस साठी वापरा
3) वडा पाव च सुखी चटणी—वडे तळताना ज्या बुंदी पडतात त्या वापरून करतात -मिक्सर मध्ये भरड दळून त्यात सोबत लाल तिखट पावडर,लसूण,मीठ घालून करा तशी भसकापुरी चटणी थोडे भाजलेले शेंगदाणे पण घाला दळताना

खास टीप- मिसळ , पावभाजी, दाबेली रोटी ,भेळेचे सर्व प्रकार या साठी हे सर्व प्रकार कमी तिखट बनवून ( मुलांसाठी ) जर सोबत लाल चटणी , हिरवी चटणी दिलीत तर मोठे ते पदार्थ आपल्या चवीनुसार जास्त तिखट बनवू शकतात

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*