बटाटा वडा

अर्धा किलो बटाटे
४ हिरव्या मिरच्या
कढी पत्ता
२ चमचे मोठे कापलेली कोथींबीर
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
१ चमचा तेल
१ लिंबू
मीठ
१ कप बेसन
१/२ चमचा धणा पावडर
चिमुटभर सोडा
तळण्यासाठी तेल

पाककृती

बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका. आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या. थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा. बेसन, धणे पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा. जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा. सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व गरम-गरम वाढा. खोबर्‍याची सुकी किंवा ओली चटणीसोबत चटपटीत तिखट वडापाव खाण्यास तयार…!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*