रोस्टेड पेपर टोमॅटो सूप

तीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड.

कृती:-  ओव्हन २०० सेल्सिअसवर तापवून त्यात मिरच्या, लसूण, कांदा व टोमॅटो २० ते २५ मिनिटे भाजून घ्यावे. काळी झालेली साल काढून गार झाल्यावर मिक्सनरमध्ये पेस्ट करावी. गाळण्याने गाळून घ्यावी.
त्यात व्हेज स्टॉक, लिंबाची साल घालून ५ ते १० मिनिटे उकळावे. चवीला मीठ, मिरपूड, लिंबाचा रस व क्रीम घालून गरम गरम प्यायला द्यावे. आवडत असल्यास उकळताना उकडलेला पास्ता घालावा.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 612 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*