टिप्स : किचन सिंक स्वच्छ कसे ठेवावे

आपल्या साऱ्या स्वयंपाकघराची, व्यवस्थितपणाची आणि स्वच्छतेची पारखच त्या किचन सिंकवरून होते. ते सिंक स्वच्छ ठेवणं खरं फार अवघड नसतं. सिंक स्वच्छ घासण्यासाठी एक वेगळा स्पंज ठेवावा. भांडी घासण्याच्या स्पंजनेच बेसिन घासू नये. भांडी घासणं, बेसिन घासणं, गाडी पुसणं, घरातील फर्निचर पुसणं यासाठी स्वतंत्र स्पंज असावेत. एकच स्पंज सर्वांसाठी असं करू नये. पिण्याच्या पाण्याची भांडी घासण्यासाठी स्वतंत्र स्पंज तर असायलाच हवा.

सिंक घासून झाल्यानंतर कोमट वा गरम पाण्यानं स्वच्छ धुवावं. हे पाणी थोडावेळ तुंबू द्यावं. त्यानं सिंकमधला ओशटपणा, तेलकटपणा निघून जातो. यासाठी आणखी एक करता येतं. कुकर झाल्यानंतर त्यातील गरम पाणी थेट सिंकमध्ये ओतावे. त्यानंही चिकटपणा कमी होतो. बेकिंग सोड्यानं घासलं तर सिंक लवकर स्वच्छ होतं. सिंकमधून येणारा वासही निघून जातो. किचनओटा, किचनओट्याभोवतालच्या टाईल्स हे साफ करण्यासाठी कधीही भांड्यांचा डिटर्जंट अर्थात साबण वापरू नये. कारण वाळल्यावर साबणाची पावडर तशीच राहते व ती हाताला, कपड्याला, भांड्यांना लागते. त्याऐवजी वॉशिंग पावडरचा फेस करून अथवा लिक्वीड सोपने ते साफ करावं. किचनओटा रोजच्या रोज घासण्याची गरज नाही.

आठवड्यातून दोनदा किंवा गरज पडेल तेव्हा तो घासावा, धुवावा. एरवी ओल्या कपड्याने पुसून घेतला तरी चालतो. स्वयंपाक करताना शक्यतो किचनओटा, टाईल्स कमीत कमी खराब होतील असं पाहावं.

पोळ्या करताना बऱ्याच जणी ओट्यावर पिठाचे साम्राज्यच तयार करतात. त्यामुळे पोळपाटाखाली वर्तमानपत्राचा कागद अथवा एखाद्या प्लेक्सबोर्डचं कापड घ्यावं.

सिंकची खालची नळी साफ करत जावी. कचरा काढत जावा. नळ गळत असल्यास तो तत्काळ दुरुस्त करावा. कारण गळक्या नळामुळेही गंज वाढू शकतो.
सिंकमध्ये खरकटं गोळा करू नये. खरकटं गोळा करण्यासाठी एक मोठी स्वतंत्र गाळणी ठेवावी. आणि तो कचरा ओल्या कचऱ्यातच टाकावा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*