खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती

आपण नेहमी खिचडी, वरई, दाण्याची आमटी उपवासाला करतो. हा उपवास वेगळा करण्यासाठी या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही रोज विविध फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.
या खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती
उसाच्या रसातील राजगि-याची खीर
साहित्य:- अर्धा कप कच्चा राजगिरा, दोन कप उसाचा ताजा रस, एक ते दोन चमचे गूळ, दोन ते तीन चमचे मगज पेस्ट, वेलची पूड, एक चमचा साजूक तूप, दोन ते तीन लवंगा, दोन चमचे किसमिस, आवडत असल्यास काजूचे तुकडे, चवीपुरतं किंचितसं मीठ.
कृती:- राजगिरा स्वच्छ धुऊन चार ते पाच तासांसाठी भिजत घालावा. नंतर कुस्करावा. हा राजगिरा दोन ते तीन शिटयांवर मऊ शिजवावा. पॅनमध्ये तूप घालावं. त्यात लवंगा घालाव्यात. लवंगांचा खमंग सुगंध येऊ लागल्यावर त्यात उकडलेला राजगिरा घालून परतावा. नंतर पुन्हा त्यात गूळ घालावा. पुन्हा एकदा मिश्रण परतून घ्यावं. मगज पेस्ट काजू-किसमिस घालून एकत्र करावी. शेवटी उसाचा रस घालावा. दोन ते तीन उकळया येऊ द्याव्यात. खिरीला उकळी येताना त्यात कणभर मीठ घालावं. खिरीचा गॅस बंद करावा. थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ पूड घालून सव्‍‌र्ह करावी. गरमागरम पु-यांबरोबर ही खीर एकदम चविष्ट लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळीचा रायता
साहित्य:- पिकलेली केळी ३, वाळलेले बारीक खोबरे १/२ कप, लिंबू १, वेनिला किंवा साधे दही १ कप, बारीक कापलेले बदाम १ टेबल स्पून,
कृती:- वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा. केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत. त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. झाला तुमचा रायता तयार. तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.
हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

उपवासाचा बटाटा वडा
सारणासाठी साहित्य:- १ किलो उकडलेले बटाटे, १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास), बारीक कापलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ
साखर, एक चमचा लिंबू रस, जीरे, दाण्याचे कुट, खवलेला ओला नारळ, तेल.
कव्हरसाठी साहित्य:- राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)
कृती:- प्रथम हिरव्या मिरच्या, व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे सोलून घ्या व बारीक करा.
बटाटे गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा. एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा. त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा. तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका. तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्याचच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

रताळ्याची कचोरी
सारण:- १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा मीठ, साखर
कव्हरसाठीचे साहित्य:- २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, थोडेसे मीठ
कृती:- रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून बारीक करावीत. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्यान ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्याुच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. गरमगरम खायला द्याव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

खजूर मिल्क शेक
साहित्य:- २ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची, थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे.
कृती:- खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा. काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या. त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा.
शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या. खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*