आजचा विषय सरबते

सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. उन्हाळ्यात जेव्हा बाह्य वातावरणातील तापमान वाढते, त्यावेळी शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीरात अनेक क्रिया घडत असतात. याचा परिणाम म्हणून घामाचे प्रमाण वाढते, शरीराला पाण्याची आवश्यअकता अधिक प्रमाणात जाणवू लागते, थंड, रसरशीत आणि पातळ पदार्थ खाण्याची इच्छा होऊ लागते. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण गुणाच्या चहा-कॉफीच्या ऐवजी शहाळ्याचे पाणी, निरनिराळी सरबते किंवा घेणे श्रेयस्कर असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, रसाची पूर्ती होते आणि मनालाही समाधान मिळते. वातावरणातील बदलांचा पडसाद जसा निसर्गात उमटतो, तसाच आपल्या शरीरात उमटत असतो. या बदलांना सहज सामोरे जाण्यासाठी आहार-आचरणात, जीवनशैलीत थोडाफार फरक करणेही आवश्यसक असते. रंगीबेरंगी आणि मनमोहक सरबते थंडावाही देतील आणि जिभेला चवही आणतील. लिंबू बाराही महिने मिळत असले तरी उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, पचन मंदावणे, पित्त वाढल्याने जुलाब होणे वगैरे तक्रारी उद्‌भवू शकतात. लिंबू आंबट चवीचे असल्याने रुचकर असते, भूक वाढवते, दीपक, पाचक, अनुलोमक गुणाचे असल्यामुळे पचन सुधरवते. असे लिंबाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरातील जलांश टिकवून ठेवण्यास मदत करते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लिंबू सरबत
साहित्य :- एक रसदार कागदी लिंबू, 40 ग्रॅमसाखर, एक चिमूट मीठ, 400 मिली लि.थंड पाणी
कृती – थोडेसे केशर, चिमूटभर जिऱ्याची पूड व वरील सर्व घटकद्रव्ये एकत्र करून प्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आलं, लिंबाचं सरबत
साहित्य : ५० लिंबे (रस) २५० ग्रॅम आलं (रस) २ किलो साखर मीठ चवीप्रमाणे १ चमचा सोडिअम बेन्झॉइट
कृती : लिंबाचा रस व आल्याचा रस काढावा. रस असेल तेवढेच पाणी घेणे. ते पाणी २ किलो साखरेत मिसळून १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. पाक थंड झाल्यावर त्यात दोन्ही रस व सोडियम बेन्झॉइट मिसळावे.सरबत देताना पाव भाग तयार झालेले सिरप, पाऊण भाग पाणी व चवीनुसार मीठ आणि बर्फाचा खडा घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोकम सरबत
वीस ग्रॅम आमसुले भिजत टाकून साधारणपणे अर्ध्या तासाने कुस्करून व गाळून घ्यावी. यात ग्लासभर थंड पाणी, आवडीप्रमाणे (एक – दोन चमचे) साखर, चवीपुरते मीठ व थोडे जिऱ्याचे चूर्ण घालून प्यावे.
बाजारात कोकमचे सिरपही मिळते किंवा कोकमची (रातांबे) ताजी फळे मिळत असल्यास घरीच सिरप बनवून ठेवता येते, त्यात चवीप्रमाणे पाणी, मीठ, जिऱ्याचे चूर्ण टाकूनही झटपट सरबत बनवता येते.
हे सरबत उन्हाळ्याच्या झळा लागल्यानंतर किंवा दुपारच्या उन्हातून फिरून आल्यानंतर घेतल्याने उन्हाचा त्रास होत नाही, तसेच पित्ताचे शमन पण होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

धणे पाणी
20 ग्रॅम धणे कुटून घ्यावेत. त्यात 120 मिली. थंड पाणी घालून रात्रभर मातीच्या माठात किंवा साध्या भांड्यात फडक्याकने झाकून ठेवावे. सकाळी रवीने घुसळून किंवा हाताने कुस्करून गाळून घ्यावे. यात चवीप्रमाणे खडीसाखर मिसळून प्यायल्यास तहान शमते, शरीरातील स्रोतसांची शुद्धी होते, अंतर्दाह नाहीसा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

थंडाई
साहित्य – 125 ग्रॅम बदाम, 1 चमचा वेलची पावडर, 3 चमचे बडीशेप, 2 चमचे पिस्ते, 2 चमचे मिरी
2 चमचे खसखस, 225 ग्रॅम साखर, 1.5 लिटर थंड पाणी, 0.5 लिटर गरम करून थंड केलेले दूध
कृती :- सर्व मसाला बारीक वाटून घेणे. थोड्या पाण्यात साखर विरघळवून, गाळून घेणे व त्यात उरलेले थंड पाणी, दूध, वरील मिश्रणाचे वाटण मिसळून दोन पातेल्यात तीन – चार वेळा वरखाली करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कैरीचं पन्हं
साहित्य :- कैऱ्या, गूळ, विलायची पावडर, मीठ.
कृती :- पन्ह्यासाठी साधारणतः कैऱ्या वाफवून घेतात. मात्र त्या भाजून घेतल्या तर त्या जास्त लाभदायक ठरतात. भाजलेली किंवा वाफवलेली कैरी साल काढून कुस्करून घ्यावी. त्यात बारीक केलेला गूळ, मीठ (चवीनुसार), विलायची पावडर टाकावी व सर्व चांगलं एकजीव करावं बरणीत भरून ठेवण्यासाठी आणि हवं तेव्हा पिण्यासाठी. मस्त गारेगार पन्हं तयार. आपल्याला हवं तेव्हा थोडं पाणी टाकून घ्यायचं. उन्हाळ्यात होणारा शुष्कतेचा त्रास पन्ह्यामुळे कमी होण्यास मदत होते. तोंडाला चव तर येतेच, पण त्यासोबत पचनशक्ती सुधारण्यासाठीही पन्हं अत्यंत उपयुक्त आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

सफरचंद शहाळे सरबत
साहित्य : सहा सफरचंद, अर्धा किलो बीविरहित द्राक्षे, तीन इंच आले, पाणी असलेले शहाळे, पिठीसाखर, भाजलेल्या जिऱ्याची पूड.
कृती : सफरचंदाच्या बिया काढून त्याच्या पातळ फोडी करा. द्राक्षेही स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत.
मिक्सारमधून दोन्ही फळांचा ज्यूस काढून घ्यावा. ज्यूस भांड्यात काढून त्यात पिठीसाखर घालावी.
सर्व्ह करताना ग्लासमध्ये तयार ज्यूस घालावा. वरून शहाळ्याच्या पाण्याचा थर द्यावा, बर्फ घालावा.
वरून जिरे पावडर भुरभुरून ज्यूस द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केशरी थंडाई सरबत
साहित्य : प्रत्येकी अर्धा किलो गाजर व बीट, पुदिन्याची 10-15 पाने, 50 ग्रॅम खडीसाखर, चार इंच आले, चाट मसाला.
कृती : गाजर, बीट व आले चिरून अर्धवट उकडून घ्या व थंड करा. उकडलेले गाजर, बीट, आले, पुदिना, खडीसाखर घालून ज्यूस करून घ्या. तयार ज्यूस फ्रिजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना वरून थोडा चाट मसाला भुरभुरावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लखनवी सुंठ सरबत
साहित्य : दीडशे ग्रॅम लखनवी बडीशेप, दीडशे ग्रॅम साखर, 25 ग्रॅम सुंठ पावडर, लिंबाचा थोडा रस.
कृती : बडीशेप व सुंठ पावडर एकत्र दळून अगदी बारीक पावडर करा. साखरेचा पाक करून तो बडीशेप व सुंठ पावडरीच्या मिश्रणात घाला. पंधरा मिनिटे उकळून कॉटनच्या पातळ कापडातून गाळून घ्या.
ग्लासमध्ये 4 चमचे वरील सिरप घालून वरून लिंबाचा रस त्यावर थंड पाणी व बर्फ घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*