कृष्णा गणपत साबळे

लोककलावंतांना मानधन मिळवून देण्यात त्यांचा सहभाग हा निश्चिनतच महत्त्वाचा आहे. शाहीर साबळे म्हटले, की सर्वांत प्रथम लक्षात येते ते त्यांचे महाराष्ट्र गीत व नंतर त्यांनी लोकप्रिय केलेली लोकगीते, भारुडे. शाहिरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. […]

तनपुरे, विजय (शिवशाहीर)

विजय तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरीत राहणारे अपंग कलावंत. आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यानी अनेक कार्यक्रम केले आहेत. अपंगत्वावर मात करीत ते जिद्दीने, चिकाटीने शाहीर झाले. त्यांच्या पोवाड्यांच्या अनेक कॅसेट आज बाजारात उपलब्ध आहेत. शाहीर म्हणून […]

अण्णाभाऊ साठे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
[…]

श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी (पठ्ठे बापूराव)

‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
[…]