गा‌यिका आशा खाडिलकर

ज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. […]

अरूण दाते

लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही. […]

वाटवे, गजानन

आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे. […]