जोशी, (पं.) यशवंतबुवा

यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. […]