मोकाशी, सुधा

Mokashi, Sudha

– वयाच्या आठराव्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ.

– टेलीकम्युनिकेशन मधील नोकरीतून १९८८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती.

– तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध
१) अबोली – महाराष्ट्र राज्य अनुदान प्राप्त
२) लाख आठवांचे दिवे – विश्व मानव एकता २००० पुरस्कार प्राप्त
३) मिळूनी सार्‍या गाऊ – गीत संग्रह तृतीय आवृत्ती प्रकाशित

– काव्य प्रेमी कला प्रतिष्ठान उपाध्यक्षपदी ६ वर्षे

– नीलपुष्प साहित्य मंडळ – कार्यकारी सभासद

– म.सा.प व को. म.सा. प साहित्य संमेलनात, कवी संमेलनात सहभाग

– शब्दांगण, मेनका, माहेर, वसुधा, अनुराग, ऑल दि बेस्ट, कायस्थ प्रबोधन, कायस्थ विकास, उत्तम कथा, वहिनी व इतर अनेक मासिकातून कथा, ललित लेखन विशेषत: कविता प्रसिद्ध

– कमलाबाई सोवनी पुरस्कार, रुणाली पुरस्कार व अनेक कवितांना बक्षीसे,

– चां.कां. प्रभू महिला गौरव पुरस्कार प्राप्त, स.पां. जोशी पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, कै. सुशीलाबाई कदम काव्य पुरस्कार

– आकाशवाणीवर पुस्तक परिक्षण व महिलांसाठी कार्यक्रम सादर.

– स्वरचित काव्यमय स्त्री जीवन कार्यक्रमाचे पासष्ट कार्यक्रम पुणे, अंबरनाथ, कल्याण, पार्ले, ठाणे येथील विविध संस्थातून सादर.

– दै. सन्मित्रमध्ये पुस्तक परिक्षणे सदरासाठी नियमित लेखन.

(संदर्भ : स्वतः दिलेल्या माहितीवरुन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*