सुभाष स नाईक

विविधांगी लेखक, कवी, मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक

सुभाष नाईक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विविध विषयांवर विपुल लेखन करतात. ते मराठीसृष्टीचे एक मुख्य लेखक असून मराठीसृष्टीविषयी प्रचंड आत्मियता असलेले आधारस्तंभ आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

श्री सुभाष नाईक यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात….

 

 


माझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो.

मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे. मी फिलिप्स या मल्टिनॅशनलमध्ये काम केलेलें आहे, व नंतर इतर बर्‍याच कंपन्यांमध्ये प्रेसिडेंट, डायरेक्टर, सीईओ अशा सीनियर पोझिशन्सवर मी काम केलेलें आहे. एका चॅरिटेबल ट्रस्टचाही मी सीईओ होतो. मॅनेजमेंट कन्सल्टन्सी तसेच कॉरपोरेट-ट्रेनिंग यांचाही मला अनुभव आहे. कांहीं पेटंटचे अर्जही माझ्या नांवावर आहेत.

मी पेशानें, ४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेला सीनियर-कॉरपोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड) असलो तरी, गेली बरीच वर्षें मी हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहे. माझी तीन पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी, ‘The Earth In Custody’ शीर्षकाचें माझें पुस्तक हें, ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी कवितांचें पुस्तक आहे. इतर दोन पुस्तकें ही, ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. पर्यावरणावरील हिंदी-हिंदुस्तानी/इंग्लिशमधील कवितांची दोन, ‘चॅलेंज्ड’ (मानसिक,शारीरिक,सामाजिक) व्यक्तींवरील बहभाषिक कवितांचें एक, व ‘Death & the Departed’ या विषयावरील बहुभाषिक कवितांची दोन, अशी ५ पुस्तकें प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आणखी काही पुस्तकांची मॅन्युस्क्रिप्टस् (पांडुलिपी) रिलीज केलेली आहेत, ज्यापैकी एक लहान मुलांसाठी कवितांचें आहे. सध्या कांहीं संशोधनात्मक व इतर लेखन मराठी, हिंदी व इंग्रजीत चालू आहे.

महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, अद्भुत कादंबरी, धर्मयुग(हिंदी), नवभारत(हिंदी), साहित्य अकादमीचें “समकालीन भारतीय साहित्य”, ‘ईप्सित‘ बडोदा, ‘कीर्तिस्तंभ‘ बडोदा, मराठी अकादमी बडोदा चॅप्टर यांचे ‘संवाद’, वगैरे वृत्तपत्रांत/नियतकालिकांत, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत माझें लेखन प्रसिद्ध झालेलें आहे. २०१२ च्या काही दिवाळी अंकांमधे माझे लेख-काव्य प्रकाशित झालेले आहे. दूरदर्शनवर कांही वर्षांपूर्वी टेलिकास्ट झालेलें ”बिन बुलाये मेहमान” हें सिट्-कॉम माझ्या स्क्रिप्टवर आधारित होतें. डीडी भारती वरून प्रक्षेपित झालेल्या ”हमारी ज़मीन हमारा आसमान” या टेलि-सीरीयल मध्ये माझ्या ६ कविता होत्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ‘TERI‘ या संस्थेने शालेय शिक्षकांना पर्यावरण या विषयाचें ट्रेनिंग देण्यासाठी बनवलेल्या प्रोग्राम मध्ये माझ्या कांही हिंदी/ इंग्रजी कविता सामील केलेल्या आहेत. गुजरात-मराठी साहित्य संमेलनात मी भाषेसंबधी एक ‘पेपर’ वाचलेला आहे. बहुभाषिक व इतर कविसम्मेलन/मुशायर्‍यामध्ये मी कविता वाचलेल्या आहेत. मराठी वाङ्मय परिषद, बडोदा यांच्यातर्फे जी लेखकांची सूचि प्रसिद्ध झालेली आहे, तिच्यात माझें नांव सामील आहे.

‘अक्षर प्रबोधन’ या नावाचा विविध कवींच्या सामाजिक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे, त्यात माझ्या काही कविता समाविष्ट आहेत. काही काव्यस्पर्धांमध्येही माझें नामांकन झालेले आहे. बिझिनेस-मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी-डेव्हलेपमेंट, परफॉर्मन्स इंप्रूव्हमेंट व लाइफ-डेव्हलपमेंट यांच्याशी संबधित विषयांवर मी इंडस्ट्रीमध्ये व चेंबर ऑफ कॉमर्समध्ये विविध भाषांमधे वर्कशॉप व ट्रेनिंग प्रोग्रॅम केलेले आहेत. सध्या मी मुख्यत: लिखाणावर व काही सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केलेलें आहे.

सुभाष स. नाईक

Subhash S Naik

१, जयकृपा, टी.पी.एस्.-६,
म्युनि. बागेसमोर, मिलन सब-वे जवळ, सांताक्रूझ (प.), मुंबई ४०००५४.
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५.
भ्रमणध्वनी : (०)-९८६९००२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in.

वेबसाईट : www.subhashsnaik.com

Marathi Author, Poet

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*