पालव, प्रमोद

इकोफ्रेंडली गणेशमूर्तीकार

नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवलाय. शाडूची माती, झाडांचा रस, कागद, डिंक आणि नैसर्गिक रंग, दगड यापासून करण्यात येणारी चमकी यांचा वापर करून तो गणराया साकारतो. या मूर्तींमुळे प्रदूषणाचा प्रश्न सुटला असल्याने कलाकार प्रमोद पालव यांच्या संशोधनाचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरव केला असून अशा हलक्या आणि इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे पेटंट पालव यांना बहाल करण्यात आले आहे.

मूर्तीकलेत आणखी संशोधन करत पालवे बंधूंनी झाडाचा रस, कागद, डिंक आणि शाडू मातीच्या मिश्रणातून अनोखे रसायन निर्माण करुन हलक्या गणेशमूर्तीची निर्मिती केली आहे. जे. जे. आर्टमधून पदवी घेतलेले प्रमोद पालव सध्या भालचंद्रनगरी कणकवलीत वास्तव्याला आहेत. जांभवडे गावचे हे पालव बंधू गावातही अशाच मूर्ती बनवितात. नैसर्गिक साहित्याचा मूर्ती कलेत कसा वापर केला जाईल आणि जास्तीत जास्त इकोफ्रेंडली मूर्ती कशी बनेल याकडेच त्यांचा कल असतो.
प्रमोद पालव यांच्या इको फ्रेंडली गणेशमूर्तीवरील एक खास लेख वाचा मराठीसृष्टीतील खालील दुव्यावर..

# Pramod Palav
Eco-Friendly Ganesh Murtikar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*