गंगाराम देवजी सपकाळ

क्रिकेट स्कोअरर व स्टॅटिस्टीशन

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे भारतामधील करोडो चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त करीत असतात. काही जण खेळाडुंची व या खेळातील ऐतिहासिक क्षणांची कातरणे आपल्या संग्रही जतन करून ठेवतात तर काही जण अगदी सुरूवातीपासून होत असलेल्या मॅचेसची इत्यंभुत माहिती साठवून ठेवतात. काही जण क्रिकेटवर विपुल लेखन करतात तर काही जण दुर्मिळ चेंडु व बॅटस्चे संग्रह करून ठेवतात. परंतु याच आवडीला आपले उदरनिर्वाहाचे साधन बनविल्याचे आपल्या विशेष ऐकिवात नाही.

गंगाराम देवजी सपकाळ हे अशाच काही नशिबवानांपैकी एक आहेत जे आपल्या आवडीला, व्यवसायाचा साचा देण्यात पुर्णतः यशस्वी झाले आहेत. क्रिकेट मॅचेस पाहण्याची, व तेही त्यातील सुक्ष्म बारकावे टिपून व अत्यंत डोळसपणे, त्यांना प्रचंड आवड होती. ते केवळ सामने पाहून थांबत नसतं तर त्या सामन्यांचा लेखाजोखा ते आपल्या वहीमध्ये त्वरित उतरवित असत. त्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी केलेल्या धावा, गोलंदाजांनी टिपलेले बळी, फलंदाजांनी ठोकलेल्या धावा, पकडले गेलेले झेल या सर्व घडामोडींची माहिती त्यांच्या संग्रही कैद होत असे.

मोठेपणी देखील त्यांच्यामधील झपाटलेला क्रिकेटप्रेमी तसूभरही कमी झालेला नाही, याउलट हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र निवडल्यामुळे तो अधिकच अचुक व परिपुर्ण  बनला आहे.

ते व्यवसायाने क्रिकेट स्कोअरर व स्टॅटिस्टीशन असून, भुतकाळात लोकमत वृत्तपत्रासाठी, त्यांनी त्या काळी कितीतरी झालेल्या सामन्यांचे संपुर्ण स्टॅटिटीकल विश्लेषण बनविण्याचे काम केले आहे. तसेच ते ‘असोसिएशन ऑफ क्रिकेट स्कोरर अ‍ॅंड स्टॅटिस्टीअन ऑफ इंडिया’ चे निर्मातेपद [फाउंडर], व व्यवस्थापकीय समितीचे सदस्यपद भुषवित आहेत. त्यांच्याकडे आतापर्यंत झालेल्या जवळजवळ सर्व सामन्यांच्या अचुक व विश्वासार्ह स्टॅटिस्टीकल नोंदी उपलब्ध आहेत.

## Gangaram Devji Sapkal

3 Comments on गंगाराम देवजी सपकाळ

  1. Shri Gangaram ji Sapkal passed away at 5.30 pm on 30th June 2022.
    May his soul Rest In Peace.
    Om Shanti.

Leave a Reply

Your email address will not be published.


*