दिघे, दत्तात्रय केसरीनाथ (द. के. दिघे)

Dighe, Dattatray Kesarinath

दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा  जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला.

वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंग्रजी लघुलिपी लेखक (stenographer) म्हणून ३७ वर्षे काम केले. सन १९७७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
राष्ट्रभाषेचे प्रचार कार्य :-
महात्मा गांधी यांची हिंदी राष्ट्रभाषा व्हावी अशी इच्छा होती. त्यानुसार आधी हिंदी भाषेच्या चार परीक्षा उत्तीर्ण करुन गिरगावामध्ये जनतेला हिंदी शिकवण्याचे कार्य सेवानिवृत्तीने केले व सुमारे पाचशे लोकांना ही भाषा शिकवली.
समाजकार्य : –
निवृत्तीनंतर सन १९८० पासून समाजसेवेस आरंभ केला  कोकणस्थ नामदेव शिंपी समाजाची ३१ डिसेंबर १९८९ ची समाजाची विविध क्षेत्रातील परिस्थिती दर्शविणारा शिरगणती (खानेसुमारी) १९९१ मध्ये एका जाहीर समारंभात प्रकाशीत केली.  समाजासाठी “वधूवर सूचक मंडळ” काढले. त्याचा लाभ अनेक विवाहोत्सुक मंडळींनी घेतला.
१९९२ पासून समाजात असलेल्या “अखिल कोकणस्थ नामदेव शिंपी प्रतिनीधी मंडळ” या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. या समाजाला लग्न समारंभ व इतर मंगल व सांस्कृतिक कार्यक्रमाची, तसेच विविध संस्थांच्या बैठकांसाठी एका ज्ञातिगृहाची आवश्यकता होती. पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी सतत ७५ वर्षे यासाठी प्रयत्न केले पण ते असफल राहिले श्री. दिघे यांनी  अध्यक्ष झाल्यावर  इतर काही संस्थांच्या कठोर प्रयत्नाने हे ज्ञातिगृह बांधून सज्ज केले.
लेखन कार्य :-
सन २००९ साली समाजाच्या माहितीसाठी व इतर इतिहास प्रेमींसाठी “कोकणस्थ नामदेव शिंपी” समाजाचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास हा ३०० पानी ग्रंथ एका जाहीर सभेत प्रकाशित केला. “दर्याचा राजा” या त्रैमासिकात “एक अल्पसंख्यांक पण विकसनशील पोटजात कोकणस्थ नामदेव शिंपी” या शिर्षकाखाली एक संशोधनावर लेख प्रकाशित केला.
ज्ञान लालसा :- ६५/६६ व्या वर्षी फला ज्योतिषी शास्त्र, हस्त सामुद्रिक शास्त्र, अंक शास्त्र (Neumerology) या शास्त्रांचा अभ्यास केला. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची “ज्योतिष शास्त्री” ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. एका निबंध स्पर्धेत ज्योतिष शास्त्रावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रु. ५०० चे बक्षीस मिळवले.
संपर्क : 
श्री. द. के. दिघे
ए-८७ कमल पुष्प, वांद्रे रेक्लमेशन,
वांद्रे, (प.) मुंबई ४०००५०
दूरध्वनी क्र. – २६४२९९५५६

(संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)