क्रिडा विश्वात सामावणार्‍या प्रत्येकाची माहिती. क्रिकेट जरी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरीही इतर अनेक खेळात मराठी खेळाडू आपली मोहोर ऊठवत आहेत. त्यांच्याविषयी माहिती येथे मिळेल.

मिस्तरी, योगेश्वरी

धुळ्यात योगासनाची फारशी क्रेझ नाही. हौसेन योगाभ्यास करावा. असेहि काही नाही. मात्र इथलीच योगेश्वरी मिस्तरी नावाची एक चुणचुणीत मुलगी फ्रान्समधील जागतिक योगस्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह तब्बल ७ पदके जिंकून आली. खर्‍या अर्थाने योगाची योगेश्वरी झालेल्या या […]

पुरंदरे, प्रसाद

कुठल्याही क्षेत्रात नव्याने काही बदल घडविण्यासाठी कुणाचा तरी पुढाकर गरजेचा असतो. अॅडव्हेंचर स्पोर्टस, ट्रेकिंग, सायकलिंग या संकल्पनांना प्रत्येक कुटुंबात स्थान मिळावे. यासाठी दहाहून अधिक वर्षे अथक प्रयत्न केल्यावर प्रसाद पुरंदरे यांनी नव्या पिढीला या क्षेत्राकडे […]

देशमुख, दिव्या

पॉंडेचरीमधील स्पर्धेत दिव्या देशमुख या नागपूरच्या चिमुरडीने सात वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय जेतेपद पटकावले आणि तिची विजयी घोडदौड सुरु झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जगातील सर्वांत कमी वयाची वुमन फिडे मास्टर हा किताब तिच्या […]

पाटील, सतीश

बावीसाव्या वर्षीच क्रीडा शिक्षक झालेले औरंगाबादचे सतीश पाटील यांनी हजारांहून अधिक अॅथलिटस् घडविले आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे वैजापूर तालुक्यातील बाभूळगावची वेगवान दौड सुरु आहे… सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची […]

महाडिक, कृष्णराज

वयाच्या दहाव्या काररेसिंगच्या खेळात उतरलेला कोल्हापूरचा कृष्णराज महाडिक आता अमेरिकेतील मोटार रेसिंग स्पर्धेत ६० देशांच्या स्पर्धकांशी स्पर्धा करणार आहे. आतापर्यंत ज्युनिअर गटात राष्ट्रीय स्तरावरील दहा मानाच्या ट्रॉफीज त्याने मिळवल्या आहेतच. कृष्णराज महाडिक यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या […]

रांगणेकर, अनिरुद्ध

खेळ तसा खर्चिक आणि सुविधांचीही वानवा… पण अनिरुद्ध रांगणेकरने यातल्या अडचणींवर मात करीत कार रेसिंगमध्ये टॉप गिअरची कामगिरी करुन दाखविली आहे. अनिरुद्ध रांगणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला टॉप गिअर हा […]

नाखवा, राजाराम चंद्राजी

ठाण्यामध्ये खेळांचा उत्कर्षा कसा होईल याचा पाया राजाराम नाखवा यांनी रोवला. त्यासोबतच  शरीर सौष्ठत्व स्पर्धेला चालना मिळावी आणि याची आवड ठाण्यातील तरुणांमध्ये निर्माण करण्यात ही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे . ठाण्यामधील आद्य व्यायामशाळा म्हणून […]

रिपोर्टर, पिल्लू

पिलू रिपोर्टर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुप्रसिद्ध पंच. ठाणे येथे स्तव्य असलेल्या पिलू रिपोर्टर यांनी १९८४-१९८५ च्या मोसमात कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. आजगायत त्यांनी अनेक स्थानिक, व राष्ट्रीय सामने तसेच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यांचे, त्यांच्या […]

मांद्रेकर, श्रद्धा

व्हि.पी.एम. महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या श्रद्धाचं शालेय शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस शाळेतून झालं. श्री प्रताप चव्हाण आणि त्यानंतर श्री. नाईक यांच्याकडून अॅथलेटिक्सचं प्रशिक्षण घेतलेल्या श्रद्धा मांद्रेकरांनी महाराष्ट्र रज्याच्या संघाचं १९८१ ते १९८६ अशी सलग पाच वर्षं कर्णधार पद भूषविलं.
[…]

1 2 3 4 6