क्रिडा विश्वात सामावणार्‍या प्रत्येकाची माहिती. क्रिकेट जरी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरीही इतर अनेक खेळात मराठी खेळाडू आपली मोहोर ऊठवत आहेत. त्यांच्याविषयी माहिती येथे मिळेल.

रामनाथ पारकर

भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंडविरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाटयाला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही. […]

प्रवीण ठिपसे

बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५. […]

प्रवीण अमरे

सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. […]

दिनकर बळवंत देवधर

१९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडीमुळे गमावला. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या. […]

खंडेराव रांगणेकर

प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती. […]

क्रिकेटपटू चंदू बोर्डे

१९५४-५५ च्या मोसमात ते प्रथम रणजी सामन्यात गुजरात विरुद्ध बडोदा संघाकडून खेळले. १९६४ पासून ते महाराष्ट्रातर्फे खेळू लागले. काॅन्ट्रॅक्टर, पाॅली उम्रिगर, रामचंद, सुभाष गुप्ते अशांचा कालखंड जेव्हा चालू होता, त्या काळात १९५८ साली चंदू बोर्डे मैदानावर उतरले. नंतर १९७२ पर्यंत ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळत राहिले. […]

रमाकांत आचरेकर

भारतरत्न सचिन तेंडुलकर सहित अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे आणि पद्मश्री व द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले ऋषितुल्य प्रशिक्षक श्री रमाकांत आचरेकर हे खर्‍या अर्थाने क्रिकेटचे  महागुरू होते.  […]

मारुती माने

१९६४ ला मेहेरदीन याला पराभूत करून ‘हिंदकेसरी’ किताब पटकावलेल्या मारुती माने यांनी त्यानंतरच्या दशकात अनेक दिग्गजांशी कुस्त्या केल्या. त्यात मास्टर चंदगीराम, सादिक पंजाबी, विष्णुपंत सावर्डेकर-पाटील आणि बसलिंग करजगी आदींचा समावेश होता. […]

कोरे, अक्षयराज

कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी तीन वर्षे ब्रेक घेतल्यानंतर त्याने पुन्हा बुद्धिबळात बाजी लावली आणि जिद्दीने ग्रॅन्डमास्टर किताब कमावला. फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत पुण्याच्या अक्षयराज कोरे ने २५०० चे विक्रमी रेटिंग कमावत स्पर्धा जिंकली. ग्रॅन्डमास्टर […]

आयरे, मोनिका

आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाड़ा एक्सप्रेस कविता राऊतचा वारसा चालविणारी नाशिकची ‘लिटिल गर्ल’ मोनिका आयरे हिने १३ च्या वर्षीच उदयोन्मुख धावपटू म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कांस्य […]

1 2 3 6