पत्रकारितेत आपली मोहर उमटवणार्‍या मराठी पत्रकारांची माहिती.

सदाशिव पांडुरंग केळकर

सदाशिव पांडुरंग केळकर हे निबंधकार, पत्रकार होते. ज्ञानदीप या मासिकाचे ते संस्थापक होते. मूर्तीपूजा आवश्यक आहे काय? आणि ग्रंथप्रामाण्य हे त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. २० डिसेंबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.   ## Sadashiv Pandurang Kelkar

बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

राजकारणी, वृत्तपत्रकार, वैदिक संशोधक, प्राच्यविद्यापंडित आणि भगवदगीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. “ केसरी” व “मराठा” ही वर्तमानपत्रे सुरु करणार्‍या टिळकांचे आग्रलेख गाजले आणि ब्रिटिश सरकारची झोप उडवणारे ठरले. मंडालेच्या तुरुंगात […]

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व […]

अशोक रामचंद्र शिंदे

श्री. अशोक रामचंद्र शिंदे हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी `सांज लोकसत्ता’, `नवशक्ती’, `सकाळ’, `अर्थनीती’, `युगधर्म’ अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय […]

श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले. […]

नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर

साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली. […]

गझलकार सुरेश भट

कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते. […]

श्रीकांत वामन नेर्लेकर

ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य संमेलनात सहभाग. व्यास क्रिएशन्स संस्थेचे मार्गदर्शक.
[…]

माळवी, संदीप

आपलं ठाणे बहुआयामी व्यक्तीमत्वांची मांदियाळीच! अशी अनेक व्यक्तीमत्व आपल्या ठाण्यात आहेत ज्यांनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपली वेगळी ओळख जगासमोर ठेवली. असंच ठाण्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जनसंपर्क अधिकारी
[…]

1 2 3 4 5 8