पत्रकारितेत आपली मोहर उमटवणार्‍या मराठी पत्रकारांची माहिती.

प्रविण कारखानीस

भुंगा जसा चंचलपणे एका फुलावरून दुसरीकडे उडून प्रत्येक फुलामधील मधाचा आस्वाद घेत असतो तश्याच प्रकारे काही व्यक्तींना सतत दुसर्‍या देशांना व अगदी दुसर्‍या टोकांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची हुरहुर लागलेली असते व अशा प्रवासवेड्या कलंदरांमध्ये प्रवीण कारखानीस यांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी निरनिराळ्या देशांना व तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आभ्यासपुर्ण भेटी देवून तिथल्या संस्कृतींशी समरस होण्यात, व तिथल्या पारंपारिक कलांचा व पदार्थांचा आस्वाद घेण्यातच आपल्या जीवनातील बराचसा काळ व्यतित केला आहे. […]

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार सदैव नव्या पिढीबरोबर वाटचाल करीत राहिले याचे कारण ते स्वत: अखेरपर्यंत वृत्तीने ताजे-टवटवीत नि तरुण होते. प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे कर्तृत्व गाजवले ते मोलाचे. […]

प्रकाश बाळ जोशी

प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे. […]

नीलकंठ खाडिलकर

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या. […]

दिलीप पाडगावकर

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती. […]

दिनेश केळुसकर

त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे. […]

गणपती वासुदेव बेहेरे

बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. […]

अरुण टिकेकर

ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते.आणिू कालांतराने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले. पुढे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. […]

अनंत भगवान दीक्षित

वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. […]

1 2 3 8