ज्या उद्योजकांनी आणि विविध धंदे करणार्‍यांनी आपल्या कामातून महाराष्ट्राचीच नाही तर देशाची मोहर जगात उमटवली आणि जे स्वत:ला सिध्द करू पाहतायेत अशा सर्व मराठी उद्योजकांची ओळख. मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही हे खोटं ठरविणार्‍या मराठी माणसांबाबत..

परचुरे, अप्पा

अप्पा परचुरे हे “परचुरे प्रकाशन मंदिर या संस्थे”चे सध्याचे संचालक असून, त्यांनी आपल्या वडिलांच्या साहित्यिक योगदानाचा यशस्वी वारसा पुढे चालवीत आहेत. अप्पांनी “माणुसकी” , “प्रकाशाची वाट” ही पुस्तके लिहिली असून “युगप्रवर्तक” या पुस्तकाचे संकलन देखील […]

दातार, अरविंद

ठाणे जिल्ह्यातील प्रसिध्द वृत्तपत्र वितरक व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या अरविंद दातार यांचं वितरण कार्य मुंबई ते बदलापूर, चर्चगेट ते विरार, कल्याण ते कसारा, भिवंडी, नवी मुंबई अश्या परिक्षेत्रांत आहे. आदित्य असोसिएट्सचे व अश्विनी पब्लिसिटीचे ते […]

अन्याल, कैलास विनायक

चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली. […]

रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी

जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.
[…]

प्रभुदेसाई, रवींद्र वामन

श्री रविंद्र प्रभुदेसाई हे एक प्रसिद्ध मराठी उद्योजक. त्यांच्या “पितांबरी” या ब्रॅन्डखाली बनविली जाणारी उत्पादने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. […]

मेहेंदळे, (डॉ.) मेधा गिरीश

डॉ. मेधा मेहेंदळे हे आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. तन्वी या ब्रॅन्डनेम खाली त्यांनी बनविलेली औषधे आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहेत.
[…]

गाडगीळ, अनंत गणेश (दाजीकाका गाडगीळ)

अनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्‍या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.
[…]

जयकुमार पाठारे

व्यावसायिक व उद्योग वर्तुळात व्ही.आय.पी मॅन म्हणुन प्रसिध्द असलेल्या आणि व्ही.आय.पी ब्रॅंडचे सर्वेसर्वा जयकुमार पाठारे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं पण तितकंच प्रेरणादायी आहे. कोल्हापूरात एका मध्यमवर्गीय कुटंबात जन्मलेल्या जयकुमार यांच्या वडिलांचं निधन जयकुमार लहान असतानाच झालं. […]

देशपांडे, मदन महादेव

एक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, कुटुंबवत्सल, लेखक, यशस्वी उद्योजक, शास्त्रज्ञ व डॉ. होमी भाभांचे जीवनाभ्यासक श्री. मदन महादेव देशपांडे. […]

परब, प्रज्ञा प्रदीप

वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रज्ञा प्रदीप परब यांनी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी…!’ या गाण्याचे बोल सार्थक करीत महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, मर्यादित वेंगुर्लाचे सक्षमपणे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. […]

1 2 3 4 5