ज्या उद्योजकांनी आणि विविध धंदे करणार्‍यांनी आपल्या कामातून महाराष्ट्राचीच नाही तर देशाची मोहर जगात उमटवली आणि जे स्वत:ला सिध्द करू पाहतायेत अशा सर्व मराठी उद्योजकांची ओळख. मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही हे खोटं ठरविणार्‍या मराठी माणसांबाबत..

मेहेंदळे, निर्मल

प्रदूषण होते म्हणून कारखानेच कसे बंद करणार? उलट कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ, पाणीव्यवस्थापन याबाबत शास्त्रीय कसोट्या वापरुन प्रदूषण रोखणे, हा त्यावरचा उपाय. हरयाणात स्थिरावलेले प्रदूषण नियंत्रक इंजिनीअर निर्मल मेहेंदळे हे गेली तीन दशके उद्योगांमध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय […]

दशरथी, (डॉ.) ज्योती

प्राध्यापकी आणि पीएचडी कडून इंजिनिअरींग उद्योग व नंतर अॅग्रेफूड उद्योग अशी डॉ. ज्योती दशरथी यांनी घेतलेली झेप प्रेरणादायी ठरली आहे. डॉ. ज्योती दशरथी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला उद्योगाची ‘चव’ न्यारी ! […]

फाळके, अभिजीत

तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि ‘आपुलकी’ चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे […]

पुणेकर , नम्रता शशांक

त्वचारोगतज्ज्ञ असतानाही वेगळे काही करण्याची जिद्द बाळगून नम्रता शशांक पुणेकर यांनी अलंकारविक्री क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्या सरकारी परवानाधारक महिला सुवर्णपारखी म्हणून लौकिक मिळविलेल्या नम्रता आता आयटी कंपनीच्या मालक आहेत. जळगावकन्येचा औरंगाबादेत आल्यानंतरचा हा प्रवास थक्क […]

लक्ष्मणराव किर्लोस्कर

लक्ष्मणराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द उद्योगपती व कारखानदार, किर्लोस्कर उद्योगसमुहाचे मुख्य प्रवर्तक. त्यांचा जन्म २६ जून १८६९ रोजी झाला. महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड या नावाने गौरवण्यात आले आहे. आज जगाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट बंधू […]

नातू, माधव

श्री माधव नातू हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. श्री नातू हे ठाणे येथील नावाजलेले बांधकाम व्यावसायिक आहेत.

जोशी, उत्तम भास्कर

श्री. उत्तम जोशी हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ठाणे येथील उद्योजक असून ठाण्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

तळेकर, गंगाराम

कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील. […]

पाटील, सोन्या काशिनाथ

सोन्या पाटील यांचे नाव आज तळागाळातील लोकांच्या तोंडावर चांगलेच रुळलेले दिसते, कारण आदिवासी वस्त्यांमध्ये काम करून तिथल्या जनतेची होईल ती सेवा करण्याचा व या जनतेचे राहणीमान उंचावण्याचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे जोपासला आहे. सोन्या पाटील […]

1 2 3 4 5