ज्या उद्योजकांनी आणि विविध धंदे करणार्‍यांनी आपल्या कामातून महाराष्ट्राचीच नाही तर देशाची मोहर जगात उमटवली आणि जे स्वत:ला सिध्द करू पाहतायेत अशा सर्व मराठी उद्योजकांची ओळख. मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही हे खोटं ठरविणार्‍या मराठी माणसांबाबत..

चारुदत्त सरपोतदार

चारुदत्त सरपोतदार हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. […]

`कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे संस्थापक जयंत साळगावकर

साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून ‘कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे. […]

उमाशंकर दाते

उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते हे एक भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक आहेत. […]

संजीव वेलणकर

श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात. ते मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक आहेत. […]

आजीबाई वनारसे

लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही. […]

संजय शंकर गायकवाड

संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे. ## Sanjay Shankar Gaikwad  

कुलकर्णी, मनोहर

वेगवेगळे कार्यक्रम, भव्य स्टेज शो आदींच्या व्यवस्थापनासाठी हल्ली ‘इव्हेंट मॅनेजर’ कार्यरत असतो. पुण्याच्या ‘मनोरंजन’ संस्थेचे मनोहर कुलकर्णी हे याच प्रकारचे कार्य गेल्या पाच दशकांहून अधिक काळ करीत आहेत. आजच्या काळाचा निकष लावल्यास कुलकर्णी हे मोठे ‘इव्हेंट मॅनेजर’ ठरतात. त्यांच्या या कार्याची, त्यांनी निरलसपणे व तत्परपणे केलेल्या सेवेची दखल नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतली असून, त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
[…]

पारकर, उदय

एका चष्माविक्रेत्या कंपनीची जाहिरात होती- बाई वर्गात येतात आणि फळ्यावर लिहायला लागतात. मात्र, त्यांना लिहिताना बघून मुले बुचकळ्यात पडतात. कारण बाई फळ्याऐवजी भिंतीवर लिहित असतात. चष्मा कंपनीच्या या जाहिरातीतील कल्पक संकल्पनेचा उदगाता होता एक मराठी […]

वैद्य, विवेक

मंदीच्या लाटेमध्ये वाहन उद्योगासारख्या क्षेत्रांपुढे मोठी आव्हाने असतात. त्यामुळेच जगभरातील आर्थिक वार्‍यांचा वेध घेतच आता वाहन उद्योगांना आपली धोरणे ठरवावी लागतात. पुण्याचे ऑटो एक्सपर्ट विवेक वैद्य हे देशोदेशीच्या बड्या वाहन उद्योगांना त्यांची धोरणे पाठविण्यासाठी उपयुक्त […]

1 2 3 5