महाराष्ट्रात इतिहासात होऊन गेलेली व्यक्तिमत्त्वे. राजे-महाराजे, संस्थानिक, शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यक्ती वगैरेंची माहिती…

बाळाजी बाजीराव.

(१२ डिसेंबर १७२१-२३ जुन १७६१) भट घराण्यातील तिसरा पेशवा (कार. १७४०-६१). नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी तो प्रसिद्ध आहे.- पहिला बाजीराव व काशीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. त्याचा जन्म मौजे साते (नाणे मावळ-पणे जिल्हा) […]

झांशीची राणी लक्ष्मीबाई (लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर)

(१९ नोव्हेबर १८३५-१८ जून १८५८) इंग्रजाविरूद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री. पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ही वाईच्या मोरोपंत तांबे यांची कन्या मोरोपंत हे दूसरे चिमाजी आप्पा यांचे कारभारी होते. मनूबाई हे तिचे […]

फडणवीस, नाना

स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’’ नाना फडणीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला. […]

टोपे, रामचंद्र (तात्या टोपे)

पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या तात्या टोपे यांचे मूळ नाव रघुनाथ! रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत व्यतीत झाले.
[…]

राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं. जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ […]

आंग्रे, कान्होजी

सरखेल कान्होजी आंग्रे मराठा साम्राज्याचे पहिले आरमारप्रमुख होते. यांनी ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज नाविक फौजांविरुद्ध लढा देऊन मराठा आरमाराचे नेतृत्व केले. कान्होजींचा जन्म अलिबाग येथे झाला. कान्होजींना इ.स. १६९८ साली मराठा सरखेल तथा आरमारप्रमुखपदी नेमण्यात […]

वामन पंडित

वामन पंडित हा रामदासाचा समकालीन असून पंडीत संप्रदायाचा प्रातिनिधिक कवी होय. त्याचा कालखंड इ.स. १६३६ ते १६९५ असा मानला जातो. तो संस्कृत पंडित होता. प्रारंभी त्याने संस्कृत भाषेत रचना केली होती, परंतु पुढे रामदासस्वामींच्या सांगण्यावरुन […]

छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहूमहाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते होते. छत्रपती शाहूमहाराजाचा जन्म २६ जुलै, १८७४ साली कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. योगायोगाने ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. […]

शिवाजीराजे भोसले (छत्रपती)

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यामधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन […]

बाजीराव पेशवे (थोरले)

हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपतीशाहू महाराज यांचे १७२० पासून तहह्यात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने […]

1 2 3