मराठी आडनाव कोशाची सुरूवात

Marathi Names Encyclopedia - The beginning of This Mega Collection

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली.

वामनाचार्य हे नांव मराठी वाटत नाही. तुम्ही मद्रासी वाटता, तुम्ही बंगाली वाटता, तुम्ही कानडी वाटता अशी मते प्रदर्शित व्हायला लागली. अितरही विविध मराठी आडनावे आढळली ती मी लिहून ठेअू लागलो आणि तेव्हापासून आडनावांचा संग्रह जो वाढतो आहे तो अजूनही वाढतोच आहे.

आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्तच आडनावे माझ्या संग्रही आहेत.  या कोशामुळे मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले, त्यानुसार नियतकालिकांत मी अनेक लेख लिहीले आहेत.

अमेरिकेत अेक संकेतस्थळ आहे. त्यावर १५० वर्षांच्या ५५ कोटी नोंदी आहेत. त्यावरून अमेरिकन आणि युरोपियन जनतेला आपली वंशावळ जाणून घेणे सोपे जाते. भारतातही असे अेखादे संकेतस्थळ निर्माण करून त्यावर भारतीयांच्या आडनावांची आणि वंशावळींची माहिती मिळू शकेल. जनगणनेतील आडनावविषयक माहिती संगणकात साठविल्यास प्रचंड माहिती (डेटा) मिळू शकेल.

तूर्तास किमान मराठीतील नावांचा कोश `मराठीसृष्टी’वर अवतरत आहे. वाचकांकडून याचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे.

आपल्या काही सूचना असल्यास जरुर कळवा. इथे असलेल्या अथवा नसलेल्याही आडनावांबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असल्यास तीसुद्धा जरुर कळवा.

24 Comments on मराठी आडनाव कोशाची सुरूवात

  1. नमस्कार.
    ‘शिरोमणी’ या आडनांवाबद्दल मला कुतूहल आहे. सुषमा शिरोमणी या एक मराठी सिनेमांच्या जुन्या producer आहेत. ( त्या वेळी अमराठी जन मराठी सिनेमा प्रोड्यूस करत नव्हते).
    परंतु, शिरोमणी हें आडनांव हिंदीभाषी प्रदेशात आहे ( माझ्याकडे एक डॉ. शिरोमणी यांचें हिंदी पुस्तकही आहे).
    – जुने कवी दुर्गाप्रसाद आत्माराम तिवारी हे हिंदीभाषी असून मराठीत काव्य करीत.ते महाराष्ट्रात रहात. श्री. अजयकुमार चोकसे मूळचे जबलपुरचे हिंदीभाषी, पण पुण्याला स्थायिक झालेले. त्यांनी मधुशाला चें मराठी भाषांतर केलेलें आहे ( त्यामुळेच माझा त्यांचा परिचय झाला , कारण मीही तें केलेलें आहे). पत्रकार अंबरीश मिश्र यांचे वडील हिंदीभाषी होते, पण आई मराठी होती. तसेंच श्रीमती माणिक वर्मा यांच्या सुपुत्रींचे. ही कांहीं उदाहरणें.
    – या संदर्भात, मला शिरोमणी या आडनांवाबद्दल जाणण्याचें औत्सुक्य आहे.
    सधन्यवाद.
    सुभाष स. नाईक

  2. नमस्कार.
    विषय काशीद हें आडनांव
    हें आडनांव माझ्या वाचण्यां / ऐकण्यांत आलेलें आहे. हा मूळ शब्द फारसी आहे. कासिद व क़ासिद असे दोन शब्द आहेत, व त्यापैकी एका वरून हें आडनांव आलें असावें. आपण एक लेख लिहून यावर माहिती दिल्यास, तसेंच कधीपासून हें आडनांव दिसून येतें, एखाद्या विशिष्ट ज्ञातीत(च) हें दिसतें काय, वगैरे माहिती दिलीत, तर आभारी होईन.
    सस्नेह,
    सुभाष नाईक

    • काशिद हे आडनाव माझ्या एका मराठा मित्राचे आहे.

  3. शनिवार १४ जानेवारी २०१७

    काशिद हे आडनाव मला २ जून १९७८ च्या नवशक्तीत आढळलं. काशीद आणि काशोद ही ही आडनावं कोशात आहेत. विद्यापीठातील योग्य त्या डिपार्टमध्ये M. Phil किंवा Ph. D. साठी संशोधन करणं आवश्यक आहे.

    गजानन वामनाचार्य.

  4. मला वेलणकर या आडनावासंबधी माहिती हवी आहे.

  5. मला सायनेकर या आडनावासंबंधी माहिती हवी आहे.

  6. आवड आडनाव आहे मराठा आहोत आडनावाच्या बाबत काही मीहिती मिळू शकेल का ते कसे पडेल किंवा नेमके काय कारण आवड आडनाव असण्याचे

  7. नमस्कार माझे कोकणाचे आडनावं करवडे होते अजून आहे नंतर आजोबा कोकणामधून औरंगाबाद मधील कसाब खेडा येथे आले तेथे त्यांचे आडनाव बापट झाले नंतर कोकणामधील आमचे गाव तळेकांठ होते त्यानुसार आमचे आडनाव तळेकर झाले खूप बदल झाले आमच्या आडनावात आता तळेकर आहे मी मराठी हस्ताक्षर विश्लेषण करतो मला फार कुतूहल आहे आपण मला माहिती दिली तर धन्यवाद

  8. मला भोयर या अदनावाबद्दल माहिती हवी जसे कि नाव कश्या वरून पडले . त्याचा अर्थ काय इ .संपूर्ण माहिती हवी .

  9. आमचे आडनाव बनसोडे (आम्ही तेली समाजाचे) आमच्या आडनावा बद्दल काही माहिती मीहिती मिळू शकेल का ? नगर जिल्ह्यात भरपूर आहेत. आमचे पुर्वज बुंदेलखंड येथून आले असं जुनी मंडळी सांगतात.

  10. माननीय वामनाचार्य सर मला खुरपडे, खुरपडी या आडनावाबद्दल माहिती हवी आहे..कृपया आपण प्रकाश टाकाल तर माझ्या पुर्वजांच्या व्यवसाय आणि प्रदेश आणि उगमाविषयी माहिती मला कळू शकेल़

  11. मला उचित या आडनावाची माहिती हवी आहे
    आणि ते कसे काय ठेवण्यात आले या विषयी
    कळवावे

  12. मी ‘कर’ या शब्दाने संपणाऱ्या 3000 आडनावांचे संकलन केले आहे. मजेदार अनुभव होता.
    प्रा. गजानन नेरकर, पुणे

  13. Mi Ganesh Dongre, gongre he adnow kse padale asel mahiti pathawalya w sandarbh abhyasasathi suchawalyas anand hoil sir. Apale kam wegale w dishadarshak ahe ase mala watate.

  14. गोरे या आडणावाची माहिती हवी आहे,
    आमचे पुर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते हे परंपरागत ऐकत आलो आहे. कृपया या आडणावा बद्दलची माहिती सांगावी.

  15. खानापुरे या आडनावाची नोंद आहे का

    मी प्रशांत पृथ्वीराज खानापुरे
    रा. नांदेड जिल्हा नांदेड
    संपर्क: ९९२१२५४९९९

  16. मला तळेकर आडनावाविषयी पुर्ण माहिती हवी आहे.

  17. सर नमस्कार
    मी अनुराधा कदम. कोल्हापूरची आहे.
    मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मला तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का. माझा क्रमांक आहे 9923262796 . या क्रमांकावर मेसेज केला तर मी तुम्हाला फोन करेन

  18. मला “अंकुश”या आदनावा बाबद माहिती हवी आहे
    आमचे आडनाव अंकुश देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण

Leave a Reply to PRASHANT KHANAPURE Cancel reply

Your email address will not be published.


*