सुलभा गोगरकर (Sulabha Gogarkar)

किती दिवस झाले आपली भेट नाही. खरं म्हणजे चुकलंच , दिवस नाहीत कितीतरी वर्षे झालीत आपल्याला बघितलंच नाही. खरं म्हणजे मला तुम्ही जसेच्या तसे आठवता. ती डोक्यावरची खाकी टोपी , खाकी ड्रेस, खांद्याला लटकवलेली पिशवी, चष्मा आणि हातात असलेली काही कागदपत्रे आणि तुमची ती सायकल. […]

शेखर वैद्य (Chandrashekhar Vaidya)

प्रथम तुम्हास साष्टांग प्रणाम, मला माहितेय मी लिहीत असलेलं हे पत्र जगातलं कोणतंच पोस्ट ऑफिस तुमच्या पर्यत पोहोचविण्यास समर्थ नाहीये तरीही आज मनातल्या भावनांना शब्दरूपात व्यक्त करुन त्यांना वाट मोकळी देण्याचा प्रयत्न करतोय. […]

अरुणा साधू (Aruna Sadhu)

काय लिहावे कळत नाही.तुम्हाला मी पाहिले नाही.आमच्या लग्नाच्या आधीच तुम्ही स्वर्गवासी झालात त्यामुळे मी सुन व तुम्ही सासरे म्हणून ,तुमचा सहवास मला लाभला नाही.पण वन्संकडून, ह्यांच्या कडून तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे.हे खूप तुमच्या आठवणी सांगायचे. […]

शिल्पा स्वामी-निंबाळकर (Shilpa Swami-Nimbalkar)

“टपाल”,”तार”,”मनिऑर्डर”, असा आवाज तर आता कालातीतच झाला आहे.हा आवाज खाकी गणवेश व टोपी घालून एक शबनमी बॅग अडकवून सायकलची घंटी वाजवून वर्णी देणारे असे पोस्टमन काका द्यायचे आणि,घरातील मोठे जे कोणी असेल त्यांची स्वाक्षरी घेवून पत्र,मनिऑर्डर हातात देवून सायकलला टांग मारून निघून जायचे.

[…]

आरती शिरोडकर (Aarti Shirodkar)

कशी आहेस? खरं तर आपण बर्‍याच वर्षांनी लिखित स्वरूपात बोलतोय त्यासाठी आम्ही साहित्यिक चे आभारच मानायला हवेत. त्यांनी आज टपाल दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवलाय. […]

निता कुलकर्णी  (Nita Kulkarni)

डाकिया डाक लाया “असं कुठल्यातरी चित्रपटातील एक गाणं होतं. सायकल वर खाकी युनिफॉर्म घालून नेटाने सायकल हाणीत घरोघरी पत्र वाटणारा तो पोस्टमन मला नेहमी आठवायचा या गाण्यामुळे . खरंच ते दिवस होते पोष्टमन चे वाट पाहण्याचे. त्याच्या सायकल ची घंटी लांबून जरी वाजली तरी आम्ही उत्सुकतेने बाहेर यायचो. […]

स्वरुपा रामदासी जोशी (Swarupa Ramdasi Joshi)

“ए ताई तुझ्या आजोबांचं पत्र आलयं”.. अशी पोस्टमन काकांची हाक ऐकायला आली की मी हातातलं सगळचं सोडून पळत जायचे.. आणि आण्णांचे(बाबांचे बाबा) पोस्ट कार्ड आलेले एका दमात वाचून काढायचे… माझे ताई आण्णा (बाबांचे आई बाबा..माझे आजी आजोबा) दिंडोरी.. जिल्हा नाशिक इथे रहायचे.. […]

परवीन कौसर (Parveen Kausar)

पत्र म्हटले कि आठवतात ते पहिले दिवस.त्यावेळी पत्र म्हणजे एकमेकांची सुख दुःख कळविण्याचे अथवा समजण्याचे साधन.पत्राचे महत्त्व एका माहेरवाशिणी पेक्षा दुसरे कोणी सांगू शकेल का? […]

स्मिता तोंडवळकर (Smita Tondwalkar)

आजही शारदाकाकी उंबरठ्यावर उभ्या राहून पोस्टमनची वाट पहात होत्या. नेहमी वेळेवर येणारी मनीऑर्डर आठ दिवस उशीर झाले तरी आली नव्हती. अरूण, शारदाकाकींचा एकुलता एक मुलगा मुंबईत कापड गिरणीत कामाला होता. कसातरी स्वतःच्या कुटुंबाचा खर्च भागवून दरमहा आईला दोनशे रुपयांची मनीऑर्डर न चूकता पाठवायचा. […]

संतोष करमाळकर (Santosh R. Karmalkar)

बरेच दिवस झाले तू एकही पत्र घेऊन आमच्या घरी आलाच नाही, इकडे सर्वजण तुझी आतुरतेने वाट पहात आहेत, अजूनही आठवते मला तू तुझ्या सायकल वर ढांग टाकून घरा जवळ येताच तुझ्या सायकल ची ” ट्रिइंग ट्रिइंग अशी बेल वाजवायचास , कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षण घेऊन यायचास, […]

1 2 3 9