महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात.
 
आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....


महाचर्चा – टपाल दिवस

९ ऑक्टोबर हा `जागतिक टपाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने एक उपक्रम होता पोस्टाच्या आठवणी जागवण्याचा. नेहमीप्रमाणे प्रतिसाद चांगलाच मिळाला.
 
महाचर्चा - टपाल दिवस


महाचर्चा – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - साहित्यिक कोण ?


मराठीसृष्टी Like करा Share करा

लेखक नोंदणी करा

नोंदणीकृत लेखक आपल्या आवडीच्या विषयावर या साईटवर लेखन करु शकतात. आपण लेखक म्हणून नोंदणी केली नसल्यास येथे क्लिक करा


सभासद व्हा आणि मिळवा फायदे

आजच मराठीसृष्टीचे सभासद व्हा आणि न्यूजलेटर, मोफत ई-बुक्स तसेच पुस्तके, इ-बुक्स आणि सॉफ्टवेअरवर आकर्षक ऑफर्स मिळवा.