गुरु रिन पोचेन सिक्कीम

सिक्कीम या राज्यातील नामची येथे गुरु रिन पोचेन यांची ३६ मीटर उंची मूर्ती आहे. सिक्कीमचे संरक्षक गुरु रिन पोचेन हे ९ व्या शतकातील बौध्द संत आहेत. इ.स. १९७५ साली सिक्कीम भारतीय संघराज्यात सहभागी झाले.

सिक्कीम: सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य

देशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.