कनकेश्वरचा श्रीराम सिद्धीविनायक

रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्‍या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे. गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या […]

थेऊरचा श्री चिंतामणी

थेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे.  ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसरच्या नंतर लोणीच्या पुढे ३ […]

महडचा श्री वरद विनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. […]