प्राचीन मांढळ

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.