श्री बल्लाळेश्वर. पाली जि. रायगड

Shree Ballaleshwar, Pali - Sudhagad

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर.  श्री बल्लाळेश्वर  हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.

मुंबईहून पनवेल-खोपोली मार्गे पाली १२४ किमी.  असून पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण मार्गे पाली १०८ किमी . आहे. पुणे लोणावळा-खोपोली मार्गे पाली हे अंतर ११५ किमी आहे. कोकण रेल्वेने गेल्यास नागोठणा हे रेल्वेस्थानक पालीपासून १३ की.मी. अंतरावर आहे.  मुंबई, पुणे  तसेच ठाणे येथून पालीसाठी थेट बसेस आहेत.

मुळ मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून सुमारे ११व्या शतकातील आहे. श्री बल्लाळेश्वराचे मंदिर व मूर्ती पूर्वाभिमुख आहेत. मूर्ती स्वयंभू आहे या देवळातील प्रचंड घंटा व भव्य बांधकाम ही येथील वैशिष्टे आहेत.

मुख्य मंदिराजवळच श्री धुंडी विनायकाचे मंदिर आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे.

अधिक माहितीसाठी बल्लाळेश्वर मंदिराची वेबसाईट –  http://www.ballaleshwar.com/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*